Tejaswini Lonari | तेजस्विनी लोणारीचं शिवजयंती निमित्तं खास फोटोशूट; फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tejaswini Lonari | बिग बॉस मराठी मधून प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणार तिच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सध्या तेजस्विनी तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. तेजस्विनी बिग बॉस मधून तिच्या दुखापतीमुळे बाहेर पडली होती. ती बाहेर पडताच अनेकानी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांनी ती पुन्हा घरात येताच यंदाचा पर्व तेजस्विनी जिंकेल असे अनेकांना वाटले होते. मात्र तेजस्विनी केवळ काही दिवसांची पाहुनी म्हणून घरात आली होती. तेजस्विनी सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. नुकतेच तेजस्विनीचे काही नवीन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Tejaswini Lonari)

 

शिवजयंतीनिमित्त महाराजांची सेवा करतानाचा व्हिडिओ ही तेजस्विनीने शेअर केला आहे. शिवजयंतीनिमित्त तेजस्विनीने हा खास फोटोशूट केला असून ते सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तेजस्विनी नऊवारी साडीत, डोक्यावर पदर, मराठमोळा साज आणि उरात महाराजांविषयी अभिमान दिसत आहे. तेजस्विनीचा हा लूक सध्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचा दिसत आहे. तेजस्वीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. या व्यतिरिक्त तेजस्विनी सध्या तिच्या नव्या सिनेमाचे शूटिंग देखील करत आहे. थ्री चिअर्स या सिनेमात तेजस्विनी झळकणार आहे. (Tejaswini Lonari)

 

सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीच्या या फोटोची चर्चा होताना दिसत आहे.
तिच्या या फोटोवर अनेकांनी अभिमान वाटत असल्याचे कमेंट केले आहेत.
या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.
लवकरच तेजस्विनी आणि किरण माने एकत्रित प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
बिग बॉस मधून देखील तेजस्विनीला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले होते.
तर आता तिच्या या नव्या फोटोशूटने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

 

Web Title :- Tejaswini Lonari | shiv jayanti 2023 bigg boss marathi fame tejaswini lonari traditional photoshoot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा