Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Ravindra Jadeja | सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उस्मान ख्वाजाची विकेट घेत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.

 

काय आहे तो विक्रम
जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत आपल्या 250 विकेट पूर्ण केल्या आहेत. या कामगिरीमुळे तो 250 किंवा त्याहून अधिक विकेट घेणाऱ्या अनुभवी गोलंदाजांच्या यादीत तो आठवा गोलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये अनिल कुंबळे हे या यादीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत. त्यांच्या नावावर 619 विकेट्स आहेत. आर अश्विन 457, कपिल देव 434, हरभजन सिंग 417, इशांत शर्मा 311, झहीर खान 311, बिशन सिंग बेदी 266 यांचा नंबर लागतो.

250 हून अधिक विकेट घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे – 619
आर अश्विन – 457
कपिल देव – 434
हरभजन सिंग – 417
इशांत शर्मा – 311
झहीर खान – 311
बिशन सिंग बेदी – 266
रविंद्र जडेजा – 250

 

अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू
यासह जडेजा (Ravindra Jadeja) कसोटीत 250 बळी आणि 2500 धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या अशी कामगिरी फक्त इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथमने केली होती. त्याने 55 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर जडेजाला हि कामगिरी करण्यासाठी 61 कसोटी सामने खेळावे लागले.

 

Web Title :- Ravindra Jadeja | ravindra jadeja becomes the fastest indian and second fastest in world cricket to 250 test wickets and 2500 test runs ind vs aus 2nd test

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या आमदाराचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘शपथविधीबाबत संजय राऊतांना…’

Chetan Sharma Resigns | BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मांचा राजीनामा

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना