Terrorists Arrested in Pune | पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS ची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Terrorists Arrested in Pune | कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी (Terrorists Arrested in Pune) पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी (Bombing Test) केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorist Squad (ATS) दिली आहे. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर करवाया प्रतिबंधक कायद्याचे (UPA) कलम वाढवण्यात आले आहे. (Pune Crime News)

पुणे पोलिसांनी (Pune Police) पकडलेल्या दोन दहशतवाद्यांची पोलीस कोठडी (Police Custody) संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना मंगळवारी (दि.25) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस.व्ही. कचरे (Sessions Judge S.B. kachare) यांच्या न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Terrorists Arrested in Pune)

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी
Mohammad Yunus Mohammad Yaku Saki (वय -24),
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान
Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23,
दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर,
कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश)
असे पकडण्यात आलेल्या दोन दहशवाद्यांची नावे आहेत. मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam (वय 31) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दहशतवाद्यांकडून पुणे (Pune), सातारा (Satara),
कोल्हापूरच्या (Kolhapur) जंगलात (Forest) बॉम्बस्फोटाची चाचणी
केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Electricity Connection In Pune | महावितरणकडून नवीन वीजजोडणी
अवघ्या 14 ते 48 तासांत मिळणार