Test Cricket | 145 वर्षात पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये असे घडले चंद्रपॉल- ब्रॅथवेटने नोंदवला ‘हा’ अनोखा विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन : Test Cricket | वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला आहे. या सामन्यात 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे घडले नाही असा विक्रम घडला आहे. हा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल या जोडीने केला आहे. क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल हे पाचव्या दिवशी खेळायला उतरताच हा विक्रम त्यांच्या नावावर झाला. त्या दोघांनी सलग पाच दिवस फलंदाजीसाठी उतरुन नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Test Cricket)

या सामन्यात पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 51 षटकांचा खेळ झाला. यावेळी ब्रेथवेट आणि तेजनारायन चंद्रपॉल 55-55 धावा करून नाबाद परतले. दुसऱ्या दिवशी पावसामुळे चहापानापर्यंत खेळ होऊ शकला नाही. यानंतर ब्रेथवेट आणि चंद्रपॉल डाव पुढे नेण्यासाठी उतरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या 221/0 अशी होती. यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ब्रॅथवेट 171 धावांवर बाद झाला, तर चंद्रपॉल 207 धावा करून नाबाद परतला. यानंतर झिम्बाब्वेने चौथ्या दिवशी 9 बाद 379 धावांवर आपला डाव घोषित केला त्यामुळे ब्रॅथवेट आणि चंद्रपॉल पुन्हा वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आणि दोघेही नाबाद परतले. पाचव्या दिवशी दोघेही खेळपट्टीवर उतरताच हा एक अनोखा विश्वविक्रम त्यांच्या नावावर झाला. (Test Cricket)

या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिला डाव 6 बाद 447 धावांवर घोषित केला.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने आपल्या पहिल्या डावात 9 बाद 379 धावांवर डाव घोषित केला.
यानंतर वेस्ट इंडिजने आपला दुसरा डाव 5 बाद 203 धावांवर घोषित केला.
यानंतर झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात 6 बाद 134 धावा केल्या. यामुळे हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला.

Web Title :- Test Cricket | tagenarine chanderpaul craig brathwaite creates the most unique world record in the history of 145 test cricket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल