प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला संशय, म्हणाले – ‘पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणात एकच मोडस ऑपरेंडी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पूजा चव्हाण प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) आणि मनसुख हिरेन प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) पुरावे नष्ट करण्याची ठाकरे सरकारची (Uddhav Thackeray Government) मोडस ऑपरेंडी एकाच प्रकारची असल्याचा संशय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांचा सहभाग असा असे प्रथमदर्शनी दिसत आहे असंही दरेकर म्हणाले. इतकंच नाही तर विमला मनसुख हिरेन यांनीही सचिन वाझे यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं सचिन वाझे यांचा राजीनामा घेतलचा पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा संशय व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर ?

पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारनं एफआयआर दाखल होऊ दिला नाही. त्यानंतर बराच वेळकाढूपणा केला. अखेर पुरावे नष्ट झाल्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यामुळं मनसुख हिरेन प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतंय का असा संशय माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतो असंही दरेकरांनी यावेळी बोलताना नमूद केलं.