Thackeray Group Leader Arrested | दादा भुसे यांचे कट्टर विरोधक असलेल्या ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याला अटक, प्रकरण नेमकं काय?

नाशिक : Thackeray Group Leader Arrested | नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing Nashik) ठाकरे गटाचे उपनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे (CM Eknath Shinde Group) मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक असलेले अद्वय हिरे (Advay Hire) यांना भोपाळ येथून ताब्यात घेतले. हिरे यांना रात्री उशिरा मालेगावच्या रमजानपूरा पोलीस ठाण्यात (Ramjanpura Police Station) चौकशीसाठी आणले होते. रमजानपुरा पोलीस ठाण्यात अटक नोंद केल्यानंतर हिरे यांना नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. आज मालेगाव येथील न्यायालयात अद्वय हिरे यांना हजर करण्यात येणार आहे. (Thackeray Group Leader Arrested)

रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी (Renuka Yantramag Industrial Cooperative Society) कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवज तयार करून जिल्हा बँकेची ७ कोटी ४६ लाख रुपयांचं कर्ज उचलून फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हिरे यांना नाशिक येथे नेत असताना हिरे समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस वाहनाला गराडा घातला होता. यावेळी हिरे यांच्या समर्थकांनी मंत्री दादा भुसे यांच्या विरूद्ध घोषणाबाजी केली.

काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनी या फसवणूक प्रकरणावर बोलताना इशारा दिला होता की, तब्बल ३२ कोटींचा हा घोटाळा असून सहकार खाते निश्चितपणे यावर पुढील कारवाई करेल. (Thackeray Group Leader Arrested)

अद्वय प्रशांत हिरे आणि एकूण ३० जणांविरोधात नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Nashik District Central Bank) विभागीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ३० मार्च २०२३ ला मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बनावट दस्तऐवज तयार करून बँकेची ७ कोटी ४६ लाख रुपयांची कर्ज उचलून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा तपास करत होती.
दरम्यान अद्वय हिरे यांनी मालेगाव सेशन कोर्टात जामिनासाठी धाव घेतली. त्यानंतर अंतरिम जामीनासाठी ते हायकोर्टात गेले.
मात्र ६ नोव्हेंबर २०२३ ला त्यांचा अर्ज फेटाळला गेला. यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली.

अद्वय हिरे हे शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक आहेत.
ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत. तसेच नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सुप्रिया सुळे संतापल्या, ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा, ‘आनंदाचा शिधा’मध्ये निकृष्ट तेल, डाळीत किडे, तर रव्यात…’