सायना नेहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह नाही, रिपोर्ट निघाला चुकीचा, उद्या खेळण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल बुधवारी थायलंड ओपनमध्ये खेळू शकेल. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (BAI) सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह नव्हता. जो रिपोर्ट आला होता तो चुकीचा होता. वास्तविक, यापूर्वी अशी बातमी आली होती की सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे आणि त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे, त्यांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. त्याच वेळी, सायना नेहवालनं म्हटलं होतं की, ‘मला अद्यापही कोरोना टेस्टचा रिपोर्ट मिळालेला नाही, हे खूप दिशाभूल करणारे आहे आणि आज सामन्यासाठी वॉर्म अपच्या आधी त्यांनी मला बँकॉकच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी सांगितले. असे म्हणत की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे.’

कोरोना साथीच्या कारणामुळं जवळपास 10 महिन्यांपर्यंत आंतरराष्ट्रीय कॅलेंडर प्रभावित झाल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड ओपन सुपर 1000 टूर्नामेंट मधून स्पर्धात्मक सामन्यात पुनरागमन करणार होती. यापूर्वी बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल बॅंकाकमध्ये होणाऱ्या या स्पर्धांच्या आधी लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे फारशी खुश नव्हती. कोविड -19 प्रोटोकॉलअंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल सायनाने नाराजी व्यक्त करत अनेक ट्विट केले होते.

सायनाने ट्रेनर आणि फिजिओला भेटण्याची परवानगी न मिळाल्याबद्दल वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) वर टीका केली होती. सायना यांनी म्हटलं की, खेळाडूंना यापूर्वीच याची जाणीव करून द्यायला हवी होती की त्यांना थायलंडमध्ये त्यांच्या स्पोर्ट स्टाफला भेटू दिले जाणार नाही.

सिंधू आणि सायना सहभागी झाले नाहीत
गेल्या वर्षी मार्च महिन्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपनंतर बीडब्ल्यूएफने हंगामास स्थगित केले होते. ज्यानंतर सायना आणि पीव्ही सिंधू यांनी ऑक्टोबरमध्ये डेन्मार्क ओपन सुपर 750 आणि सारलोरक्स सुपर 100 मध्ये भाग घेतला नव्हता.

त्याचबरोबर योनेक्स थायलंड ओपन 12 ते 17 जानेवारी दरम्यान खेळला जाईल. यानंतर 19 ते 24 जानेवारी दरम्यान टोयोटा थायलंड ओपन आणि बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स 27 ते 31 जानेवारी दरम्यान खेळला जाईल.