Thalaiva Rajinikanth | रजनीकांत हे जेलर चित्रपटाचे काम संपवून जाणार हिमालयात; आध्यात्मिक प्रवासाला करणार पुन्हा सुरुवात

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्व तरुणाच्या तोंडात एकच गाणे आहे ते म्हणजे अभिनेत्री तमन्ना भाटिया व अभिनेते रजनीकांत (Thalaiva Rajinikanth) यांच्या ‘जेलर’ चित्रपटातील (Jailer Movie) ‘कावाली’ हे गाणे (Kaavaala Song) आहे. रजनीकांत यांचा आगामी ‘जेलर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटातील गाण्यांचा व टीझरच्या (Jailer movie Teaser) सर्वत्र चर्चा आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Thalaiva Rajinikanth) हे चित्रपटाचे काम पूर्ण करुन हिमालयामध्ये (Rajinikanth In Himalaya) जाणार आहेत. रजनीकांत हे येत्या 6 ते 7 ऑगस्ट पर्यंत चित्रपटाचे काम पूर्ण करणार असून ते हिमायलात अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करणार आहे.

अभिनेते रजनीकांत हे अनेक दशके चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र त्यांनी एक परंपरा त्यांची कायम पाळली आहे. रजनीकांत व आध्यात्म यांचे जूने घट्ट नाते आहे. प्रत्येक चित्रपटानंतर ते हिमालायामध्ये आध्यात्मिक शांततेसाठी (Rajinikanth Spiritual Trip) जात असतात. मात्र 2010 साली त्यांच्या आरोग्यामुळे ही त्यांची परंपरा खंडित झाली. मात्र पूर्णपणे बरे झाल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा हिमालयवारी सुरु केली. 2018 साली त्यांनी ‘काला’ (Kaala) व ‘ रोबोट 2.O’ (Robot 2.O) या चित्रपटानंतर आपल्या आध्यात्मिक प्रवासाला पुन्हा सुरुवात केली.

अभिनेते रजनीकांत (Thalaiva Rajinikanth) यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Rajinikanth Hit Movies) गाजले आहेत. रजनीकांत यांचा लवकरच ‘जेलर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक पर्वणी ठरणार आहे. यामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), जैकी श्रॉफ (Jackie Shroff), शिवा राजकुमार (Shiva Rajkumar), सुनील (Sunil), रम्या कृष्णन (Ramya Krishnan), योगी बाबू (Yogi Babu) व विनायकन (Vinayakan) असे अनेक कलाकार भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एक ॲक्शनपट असणार असून यामध्ये थलायवा यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ,
कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर दुर्घटना; गर्डर कोसळल्याने पाच अभियंत्यांसह १७ जणांचा मृत्यु, ३ जखमी

PM Modi’s Pune Visit: Metro Rail Inauguration, Waste-to-Energy Plant, and PMAY Houses – Live Updates