Thane Police News | ऑन ड्युटी पोलिसाची रेल्वे पोलिसांनी दिली मृत्यूची खबर; अजब घटनेने सर्वांचे डोके चक्रावले

अंबरनाथ : Thane Police News | अंबरनाथ परिसरामध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडली आहे. ऑन ड्युटी (On Duty Police) असणाऱ्या जीवंत पोलिसाचे श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल झाले आणि त्या पोलिसाचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाला असल्याची माहिती देखील पोलिसांकडूनच देण्यात आली होती. आपल्य़ा श्रद्धांजलीची पोस्ट पाहून त्या ऑन ड्युटी पोलिसाला (Thane Police News) देखील धक्का बसला आणि पुढे या सर्व घटनेचा खुलासा झाला.

पोलीस प्रदीप सुरेश सोनावणे (Police Pradeep Suresh Sonawane) रोज प्रमाणे ड्युटीसाठी रेल्वेने निघाले होते. मात्र दरम्यान अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर (Ambernath Railway Station) रेल्वे पकडताना गर्दीचा फायदा घेत एका पाकीट माऱ्याने पोलिसाचे पाकीट मारले. या पाकीट मारी करणाऱ्या चोऱ्याने सकाळी पावणे नऊच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवरुन फलाट क्रमांक तीनवर रुळावरुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुसाट जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस (Sinhagad Express) रेल्वेखाली येऊन चिरडून मृत्यू झाला. या रेल्वे अपघातामध्ये मृताच्या शरीराच्या अगदी चिंध्या चिंध्या झाल्या. या अपघातानंतर पोलिसांकडून मृतदेह छाया रुग्णालयामध्ये नेण्यात आला. मृतदेहाच्या पाकीटामधून पोलिसांना पोलीस प्रदीप सुरेश सोनावणे यांचे पॅनकार्ड मिळाले. पाकीटामध्ये पॅनकार्ट मिळाल्याने पोलिसांना (Thane Police News) तो मृतदेह प्रदीप सोनावणे यांच्या असल्याचे निष्कर्ष काढून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कल्याण रेल्वे पोलिसांकडे (Kalyan Railway Police) त्यांचा अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. आणि सोनावणेंच्या घरी देखील ही बातमी कळवण्यात आली.

प्रदीप सोनावणे यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या या अपघाती मृत्यूची खबर कळता त्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली. सोशल मीडियावर देखील अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आपल्या स्वतःच्या श्रद्धांजलीचे मेसेज पाहून प्रदीप सोनावणे यांना देखील आश्चर्याचा धक्काच बसला. पुढे त्यांनी घडलेल्या प्रसंगाचा खुलासा करत सत्य समोर आणले.
या अपघातामुळे कल्याण रेल्वे पोलिसांची देखील तारांबळ उडाली. सोनवणे यांनी संदेश देत सर्वांना सत्य सांगितले.
त्यांनी या संदेशामध्ये म्हटले आहे की, ‘मी प्रदीप सुरेश सोनवणे, आगरी पाडा पोलिस स्टेशन (Agripada Police Station)
येथे कार्यरत असून बुधवारी सकाळी दिवस पाळीवर जात असताना अंबरनाथ स्टेशन येथे आलो.
तेथून अंबरनाथ ते भायखळा प्रवासासाठी सकाळी 7.51 ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल
(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Local) पकडत असताना माझे पाकीट मारले गेले.
परंतु लोकल सुरू झाल्याने मला ट्रेनमधून उतरता आले नाही. आणि मी पुढे निघून गेलो.
मी सुरक्षित असून, आगरीपाडा पोलिस स्टेशन येथे ड्यूटीवर आहे. वरचेवर येणाऱ्या मेसेजमुळे मला मानसिक त्रास होत
असून कोणीही माझ्या नावाचे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन पोलीस प्रदीप सोनावणे यांनी केले आहे.

पोलिसांनी अपघातात मृत्यू झालेल्या पाकीट चोराच्या पाकिटामध्ये पॅनकार्ड सापल्याने ते त्याचेच असल्याचा अंदाज
लावत कारवाई केली. मात्र ते एका ऑन ड्य़ुटी पोलिसाचे असल्याचे पोलीस प्रदीप सोनावणे यांनी स्वतः खुलासा
केल्यानंतर लक्षात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Toll Hike | मुंबईचा रस्तेप्रवास महागला; पथकराच्या दरामध्ये झाली वाढ,1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू