अॅम्बीव्हॅली बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
कंपनीच्या कामासाठी आलेल्या एका दिल्ली येथील तरुणीवर सुरक्षा रक्षकाने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. याप्रकरणी आरोपीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी आणि सात हजार रुपयांचा दंडाची शिक्षा दिली.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’030c66fb-8f50-11e8-b084-490070ebc026′]

ही घटना डिसेंबर २०१० मध्ये मुळशी तालुक्यातील अॅम्बीव्हॉली येथे घडली होती. घटनेनंतर आठ वर्षांनी पीडित तरुणीला न्याय मिळाला.

धमेंद्रकुमार रामबाबुल चौधरी उर्फ सिंग असे शिक्षा झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
कंपनीच्या कॉन्फरन्ससाठी अ‍ॅम्बीव्हॅली येथे आलेल्या दिल्ली येथील अकाऊंट एक्झुकेटिव्ह तरूणीवर सुरक्षा रक्षकाने बलात्कार होता. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.