कर्नाळ्याजवळ पूल खचला, तीन तासांपासून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रायगड :पोलीसनामा ऑनलाईन

रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कर्नाळाजवळील पूल खचल्यामुळे गेल्या तीन तासांपासून मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

याबाबत मिळालेली आधिक माहिती अशी की , राज्यात कालपासून विविध ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कर्नाळाजवळील पूल खचल्यामुळे या गेल्या तीन तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे महामार्गावर लांबच लांब गाड्यांची रांग लागली आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येत आहे. मात्र, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे मुंबईहून गोव्याकडे आणि गोव्याहून मुंबईकडे जाणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

[amazon_link asins=’B01EAUIW2S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ae0a012-7852-11e8-b139-4f7aa5f9bb57′]

याचबरोबरच ,मुंबईसह राज्यात कालपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे.  पावसामुळे मुंबई शहरापेक्षा उपनगरांत आणि ठाणे, पालघर आणि रायगडमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  मुंबई आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिराने धावत आहेत. राज्यात इतर ठिकाणी देखील पावसामुळे दुर्घटना घडल्याच्या बातम्या आहेत.  दरम्यान, येत्या २४ तासात जोरदार सारी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.