रडणे थांबवत नसल्याने चक्क चिमुकल्याच्या तोंडात कोंबला मसाला 

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाईन

लहान बाळांना देवा घरची फुले म्हणली जातात, ज्या ठिकाणी लहान मुलांना घडवले जाते, त्यांच्यावर संस्कार केले जातात, अश्या ठिकाणी म्हणजेच अंगणवाडीत एक लहान चिमुरडा रडने थांबवत नसल्याने त्याच्या तोंडात चक्क मसाला कोंबल्याची घटना समोर आली आहे.
[amazon_link asins=’B019592KZY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e864264-85d5-11e8-9978-57d7bd595334′]

आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील भूशनगुल्ला येथील एका अंगणवाडीत आई आपल्या बाळाला सोडून घरी निघून गेली, आई दिसत नसल्याने चिमुरड्याला रडणे अनावर झाले. चिमुरडा रडू लागला, त्याचे रडने थांबवण्यासाठी अंगणवाडीत काम करत असलेल्या कुमारी नावाच्या सेविकेने बरेच प्रयत्न केले, परंतु तो शांत होत नव्हता, त्यामळे संतापलेल्या त्या सेविकेने त्या चिमुरड्याच्या तोंडात चक्क मसाला कोंबला. या प्रकरणी त्या चिमुरड्याच्या पालकांनी आणि स्थानिक लोकांनी त्या अंगणवाडी सेविके बद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

दिल्ली येथे देखील काही दिवसांपूर्वी फी भरली नसाल्या कारणामुळे ५० चिमुकल्याना शाळेतील बेसमेंट मधल्या अंधाऱ्या खोलीत तब्ब्ल पाच तास कोंडून ठेवण्यात आले होते. आणि हैद्राबाद येथिल ही घटना पाहता शिक्षण संस्था केवळ पैशांपायीच चालवल्या जातात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

You might also like