‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊन, पहिले पाकिट उघडल्यानंतर, चुकीच्या दराचे कारण देत निविदा मागे घेणाऱ्या ठेकेदारांना यापुढे काळ्या यादीत टाकले जाणार असल्याचा निर्णय स्थायी समितीच्या बुधवारी (दि.18) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आयत्यावेळीस हा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यास मान्यता देण्यात आली.

[amazon_link asins=’B0764G14TS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’083b5bd9-8b37-11e8-830e-ebaf36e88fda’]

पालिकेच्या वतीने विविध विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येते. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजित विकासकामांच्या निविदा काढल्या जातात. या निविदा भरताना ठेकेदाराला कोणते काम किती रूपयांमध्ये तसेच किती कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे, याची माहिती अटी व शर्तींच्या समावेशासह असते. दरम्यान, महापालिकेच्या विविध विभागांच्या विकासकामांची अथवा खरेदीची निविदा प्रक्रिया पार पाडताना पहिले पाकीट फोडल्यांनंतर आपण निविदेत भरलेला दर चुकीचा असल्याचे कारण देत, अनेक ठेकेदार आपली निविदा मागे घेत असल्याचे स्थायी सदस्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत ठराविक रकमेची निविदा सादर केलेल्या ठेकेदारांचा समावेश असतो.

या प्रक्रियेत निकोप स्पर्धा होत नसून, ठेकेदार रिंग करत असल्याचे उघड झाले आहे. ठेकेदारांकडून केवळ अन्य ठेकेदाराला पूरक परिस्थिती निर्माण करून देण्यासाठी असा प्रकार केला जातो. त्यामुळे निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन देखील पहिले पाकिट फोडल्यानंतर, चुकीचे दर भरल्याचे कारण सांगत निविदा प्रक्रियेतून मागार घेणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत समावेश केला जाणार आहे.