काम केले महिनाभर पगार फक्त सहा रुपये, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आगरा : वृत्तसंस्था
महिनाभर राबराब राबूनही तरुणाला केवळ सहा रुपये पगार मिळाला. यामुळे निराश झालेल्या तरुणाने कारखान्यातच गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच इतर कर्मचाऱ्यांचं लक्ष गेल्यामुळे त्याचे प्राण वाचले. सिकंदरामधील एका चप्पलच्या कारखान्यात हा प्रकार घडला आहे.
[amazon_link asins=’B07B4LDV55′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’249311da-a6cb-11e8-95ac-11413c5cac7d’]
सिकंदरा पोलिस स्टेशनचे एसएचओ अजय कौशल यांनी दिलेल्या  माहितीनुसार, “हा तरुण कारखान्यात अनेक वर्ष काम करत होता. अनेक दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. 27 जुलैला त्याचा अपघात झाला होता. उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या उपचारांचा खर्च कारखान्याच्या मालकाकडून करण्यात आला. तब्येत सुधारल्यानंतर तरुण कारखान्यात कामावर परतला. यावेळी त्याने आपला पगार मागितल्यानंतर मालकाने त्याला केवळ सहा रुपये दिले.”
[amazon_link asins=’B019MQONW8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e9ea1da-a6cb-11e8-80fb-cb8db6bcd1c5′]
सदर तरुणाचा अपघात झाल्यानंतर त्याच्या इलाजाचे पैसे कारखाना मालकाने खर्च केले होते. ते पैसे हफ्त्यांमध्ये घ्या अशी विनंती तरुणाने आपल्या मलकाला केली होती. परंतू मालकाने त्याची विनंती अमान्य केली. तरुणा वारंवार आपल्या मालकाला विनंती करत होता. मात्र मालक एेकण्याच्या परिस्थितीत नव्हता. शेवटी आलेल्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला. “बुधवारी कारखान्यात आल्यानंतर तरुणाने सिलिंग फॅनला लटकून गळफास घेतला. मात्र कारखान्यात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची नजर त्याच्यावर गेली. तातडीने त्यांनी तरुणाला फासावरुन खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सद्या त्याची प्रकृती स्थिर आहे.