राज्यपाल कोश्यारी यांना राज्य सरकारकडून विमानच उपलब्ध करून दिले नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये काही कारणावरून त्यांच्यात अनेक मुद्यावरून वाद पाहताना दिसत असतात. तसेच सध्याचा सुरू असलेला वाद म्हणजे, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून वाद हा आहे. तर मुंबईतुन एका कार्यक्रमासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे जात होते. तेव्हा तेथे राज्य सरकारने विमानच उपलब्ध करून न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या घटनेमुळे आणखी एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे प्रथमच मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहराडून येथे जाणार होते. गुरुवारी सकाळी १० वाजता मसुरी येथे नवनियुक्त IAS अधिकारी १२२ बॅच कार्यक्रमासाठी जाणार होते. तर त्यावेळी मुंबई विमानतळावर राज्यपालांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करून दिले नाही. विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याचे परवानगी दिली नाही.

दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी चार्टर विमानाऐवजी नियमित असणाऱ्या विमानाने ते देहरादूनला गेले. राज्य शासनाने चार्टर फ्लाईट पूर्व नियोजित उपलब्ध करून द्यावे, असे राजभवनाकडून सांगण्यात आले होते. ते उपलब्ध का करून दिले गेले नाही याची माहिती अजूनही मिळालेली नाही.