ग्रामसेवकाचा प्रताप… घरकूल सर्वेच्या नावाखाली केली वसूली

तासगाव | पोलीसनामा आॅनलाइन – तालुक्यातील लोढे गावात घरकुलांच्या घरांच्या सर्वेच्या नावाखाली दिवसा ढवळ्या वसुली करण्याचा उद्योग प्रशासनातील काही मंडळींनी केला आहे. मंगळवारी व बुधवारी गावात झालेल्या या सर्वेत ६० घरांची पाहणी करण्यात आली. यावेळी यासाठी नेमलेल्या एका ग्रामसेवक व डाटा ऑपरेटरने प्रत्येकी ५० प्रमाणे ३ हजार रुपयांची वसुली केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रकरणी संपर्क केला असता सदर दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पंतप्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. या अंतर्गत गोरगरीब लोकांना घरे देण्याचे सुरू आहे. याआधीही याच्या ऑफलाईन याद्या पाठवण्यात आल्या होत्या. मात्र गावोगावी अनेकांनी बोगस नावे घरांसाठी नावे त्यात घुसवली गेली होती. यात गोलमाल झाल्याने या याद्या रद्द ठरवत ऑनलाइन अर्ज भरणे सुरू केले होते. यासाठी सदरच्या व्यक्तीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्या जागेचा व सद्यस्थितीचा फोटो घ्यायचा होता.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लोढे गावात हा सर्व्ह सुरू होता. एक डाटा ऑपरेटर व एक ग्रामसेवक यांची नेमणूक करण्यात आली होती. गावातील तरुणांच्या मदतीने या घरांचे फोटो काढण्यात येत माहिती घेतली गेली. व त्यानंतर ६० घरांचे प्रत्येकी ५० प्रमाणे ३ हजार रुपये घेतल्याचे गावातून लोकांनी सांगितले. याप्रकरणी संपर्क केला असता आम्ही पैसे घेतले नसल्याचे सांगत उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. हा गंभीर प्रकार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.‘या’ जुगार केंद्रावर (लुडो) पोलिसांची धडक कारवाई 

नवऱ्याने केला बायकोवर राॅकेल अोतून पेटविण्याचा प्रयत्न

इंदापूर : पत्नीने घरी येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या नवरोबाने तिच्या अंगावर राॅकेल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि.२२ नोव्हेंबर) दुपारी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडली. नव-यास भिगवण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अमीर यासीन मुलाणी (रा. भिगवण,प्रभाग क्र.४,ता.इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी फरीदा अमीर मुलाणी (वय २१ वर्षे रा. भिगवण) हिने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी सांगितले की, आरोपी अमीर मुलाणी याने आपल्या पत्नीकडे आपणाबरोबर ताबडतोब आपल्या घरी येण्याचा आग्रह धरला होता. मात्र आपण थोड्या वेळाने घरी जावू असे पत्नी म्हणत होती. याचा राग येवून आरोपीने तीला शिवीगाळ, दमदाटी केली. मारहाण करून तिला जिवे मारण्याचे उद्देशाने घरातील रॉकेलने भरलेल्या कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अश्या आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली आहे. पुढील तपास सुरू आहे.