‘या’ क्रिकेटरने भरला सर्वाधिक आयकर

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठमोठे पराक्रम गाजवले आहेत. पण फक्त मैदानापुरतेच मर्यादित न राहता धोनीने मैदानाबाहेरही पराक्रम केला आहे. धोनीने बिहार आणि झारखंड मधून सर्वाधिक आयकर भरला आहे.
[amazon_link asins=’B079R1JS6K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c2dede9-8f3a-11e8-ab8f-df7adee48fa2′]

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी हा बिहार आणि झारखंड राज्यातील सर्वाधिक टॅक्स भरणारा व्यक्ती ठरला आहे. महेंद्रसिंग धोनीने 2017-18 या वर्षात तब्बल 12.17 कोटी रुपये इतका टॅक्स भरला आहे. यापूर्वी धोनीने 2016-17 या वर्षात 10.93 कोटी एवढा टॅक्स भरला होता.
फोर्ब्स मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार जगातील पहिल्या शंभर श्रीमंत खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे. तर फोर्ब्सनुसार 2015 साली धोनीची कमाई 111 दशलक्ष डॉलर्स एवढी होती. धोनी बीसीसीआयच्या ‘अ’ दर्जाच्या खेळाडूंमध्ये करारबद्ध आहे. याशिवाय आयपीएल आणि जाहिरातींमधून धोनीला भरघोस मानधन मिळते.