मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बंदुकीचा धाक दाखवत लुटले

नवी मुंबई -पोलिसनामा ऑनलाईन

पुण्यातील स्वारगेट येथून खाजगी प्रवाशी कारने खारघरला जाणाऱ्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकार, अँकरला कारमधील चौघा लुटारुंनी बंदुकीचा धाक दाखवत लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी अज्ञात चौकडीवर चोरीचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39451ae0-8aaf-11e8-80f6-23bc62af9205′]

गिरीश निकम (वय – 41, रा. खारघर सेक्टर-12 ) असे या पत्रकाराचे नाव आहे . निकम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

अशी घडली घटना 
गिरीश निकम हे एका मराठी वृत्तवाहिनीमध्ये न्युज अँकर म्हणून काम करतात. गेल्या सोमवारी गिरीश वैद्यकीय उपचारासाठी पुणे येथे आले होते . त्यानंतर सायंकाळी ते पुन्हा खारघर येथे परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेले . रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी डेपोमध्ये बसची वाट पाहत असताना, एक मजबुत बांध्याच्या व्यक्तीने त्याच्याजवळ खाजगी प्रवाशी कार असून त्यात फक्त एकाच प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचे सांगितले. यावेळी गिरीशने देखील घरी पोहोचण्यास जास्त उशीर होऊ नये, यासाठी या खाजगी प्रवाशी कारने अडीचशे रुपयांमध्ये खारघर येथे जाण्याची तयारी दर्शवली. गिरीश पांढऱ्या रंगाच्या एसेन्ट कारमध्ये जाऊन बसला, त्या कारमध्ये चालकासह चार जण बसले होते. त्यानंतर ती कार मुंबई – पुणे एक्सप्रेस मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना, तळेगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. त्यानंतर पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर कार चालकाने लंघुशंकेच्या निमित्ताने एका ठिकाणी कार थांबवली.

यानंतर चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीशच्या बाजुला येऊन बसला बसल्यानंतर त्याने गिरीशच्या कमरेला बंदूक लावून त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याच्याजवळ जे काही आहे, ते काढून देण्यास बळजबरी केली. अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असलेले पाकीट जबरदस्तीने काढून घेतले.
[amazon_link asins=’B0784D7K7S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f7b869d-8aaf-11e8-b7c8-7d429ec9e90e’]

एटीएम मधून काढली रक्कम 
त्यानंतर लुटारुंनी गिरीशजवळ असलेले एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेत त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला ठार मारण्याची धमकी देऊन एटीएम कार्डचा पासवर्ड विचारुन घेतला. चौघांनी काही किलोमीटर अंतरावर कार थांबवून गिरीशच्या एटीएम कार्डचा वापर करत त्याच्या खात्यातील 41 हजाराची रोख रक्कमही काढुन घेतली.

लुटून रस्त्यात सोडले
लुटारुंनी गिरीशला त्याचा मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड परत देऊन त्याला कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर टाकून पलायन केले. त्यानंतर गिरीशने डोळ्यावरची पट्टी काढून मोबाईल फोनवरुन आपल्या मित्रांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लुटारुंनी त्याच्या मोबाईलमधील दोन्ही सिम कार्ड काढून घेतल्याचे त्याच्या लक्षात आले.

यानंतर एका रिक्षा चालकाची मदत घेऊन कळंबोली पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीगत सांगितली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील अज्ञात चौघां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.