Video : ‘सिंबा द लॉयन किंग’ : किंग शाहरुख खानला आली आई-वडीलांची आठवण, म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डिजनी एनिमेशन्सची सगळ्यात प्रसिद्ध आणि चर्चित कथेमधील एक ‘सिंबा – द लॉयन किंग’ पुन्हा एकदा वापसीच्या तयारीत आहे. यावेळी हा चित्रपट पहिल्यापेक्षा जास्त व्यापक, जास्त आकर्षक, जास्त चांगली आणि प्रभावी पद्धतीने तयार आहे. भारतामध्ये या चित्रपटाचे हिंदी, इंग्लिश आणि तेलगू डब वर्जन प्रदर्शित केले जाणार आहे. हिंदी डब वर्जन मुफासा (फादर लायन) चा आवाज स्वतः शाहरुख खान देणार आहे आणि सिंबा (बेबी लायन) चा आवाज शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देणार आहे.

शाहरुख खानने चित्रपटाबद्दल सांगितले की, ‘ही कथा आपल्याला एक वंशानुगत नैतिक शिक्षा देते. मी चित्रपटांना मनोरंजक म्हणून पाहतो. हा चित्रपट मनोरंजक आहे. लहान मुले आपल्या आई-वडिलांसोबत मोठे होतात तेव्हा ते या गोष्टीवर लक्ष देत नाही की, आई-वडील त्यांना काय शिकवतात. जे नंतर त्यांना खूप उपयोगी पडू शकते. ‘

शाहरुख पुढे म्हणाला की, हे खूप वाईट आहे की, आपले आई-वडील आपल्याला जे शिकवतात ते आपल्याला त्यांच्या गैरहजरीत कळते. जेव्हा ते आपल्यापासून लांब जातात. शाहरुखला जाणवते की, त्याच्या आई-वडिलांनी छोट्या-छोट्या गोष्टी त्याला शिकवल्या होत्या, जी आत्ता त्याला परिभाषित करतात. आता त्याला जाणीव होते जेव्हा ते जवळ नाही.

काय आहे ‘द लॉयन किंग’ ची कथा
चित्रपटाची कथा एका लहान सिंहाची (सिंबा) आहे. ज्याचे आई-वडिल त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याचा काका खूप जळत असतो. कारण सगळी सत्ता सिंबाला मिळणार म्हणून. सत्तेवर कब्जा करण्यासाठी सिंबाचा काका एक षडयंत्र रचतो. तो सिंबाचे वडिलांची हत्या करुन टाकतो आणि सिंबाला घाबरवून राज्यामधून बाहेर पडण्यास मजबूर करतो. यानंतर सत्ता सिंबाच्या काकाला मिळते. मग सिंबाचे काय झाले ? तो परत आपल्या राज्यात परत येईल का ? जर आला तर कसा येईल ? कसे तो आपल्या वडिलांचे स्पप्न पुर्ण करुन पुन्हा राज्य मिळवेल ? ही चित्रपटाची कथा आहे.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या