१० वी-१२वी निकालाच्या बाबतीत समाज माध्यमांवर फिरणारा तो मेसेज चुकीचा

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च 2018 या कालावधीत घेण्यात आलेलल्या दहावी – बारावी परिक्षांच्या निकालाकडे सर्व विध्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये समाज माध्यमांवर बारावीचा निकाल 27 मे रोजी तर दहावीचा निकाल 6 जून रोजी लागणार असल्याचे मेसेजेस् व्हयरल झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अद्यापपर्यंत जाहीर केली नसून अनधिकृत तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन शनिवारी प्रसिद्वीपत्रकाद्वारे केले आहे. 10वी, 12वी परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळामार्फत बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहती राज्य शिक्षण मंडळाचे प्रभारी डाॅ. अशोक भोसले यांनी दिली आहे.