विधान परिषदेसाठीच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यातील संभाव्य उमेदवारांच्या नावाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, राज्यपालांना पाठवण्यात येणाऱ्या यादीत नेमकी कोणाची नावे आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली.

यासंदर्भात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला. या प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात आली आणि तो प्रस्ताव मंजूर झाला. त्यामध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या प्रत्येकी चार म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी चार जणांना विधासभेवर संधी देण्यात येणार असल्याचे, त्यांनी सांगितलं.

राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रातील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असावेत अशी तरतूद आहे. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संभाव्य नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवतील. मात्र, सध्या ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हे शीतयुद्ध सुरु असल्याने राज्यपाल कोश्यारी आता काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यपाल नियुक्त १२ संभाव्य आमदारांची नावे –
१. शिवसेना :
आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, सचिन अहिर
२. राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आदिती नलावडे, आनंद शिंदे
३. काँग्रेस : सत्यजित तांबे, नसीम खान, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत अथवा राजू वाघमारे

You might also like