22 भाषांमध्ये भारतीय लोक देतायेत एकच संदेश, ‘बिग बी’ अमिताभनं शेअर केला व्हिडीओ

बॉलीवूडनामा ऑनलाइन –कोरोना व्हायरसविरुद्ध असलेल्या या लढ्यात सर्वजण सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत आहे. सर्वांनी एकता ठेवल्यानंच ही गोष्ट शक्य झाली आहे. बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात देशातील 22 वेगळ्या भाषा बोलणारे लोक एकच संदेश देताना दिसत आहेत.

अमिताभ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओचा मेसेज असा आहे की, “कोरोनामुळं लोक दूर आहे. परंतु भारतीय असल्याची भावना कायम असल्यानं लोक एकजूट आहेत जे धाडसाचं प्रतिनिधित्व करतं. धैर्यामुळंच लोकांमध्ये विश्वास आहे जो करूणा किंवा सहानुभूतीच्या रुपात दिसतो. व्हिडीओ ट्विट करताना बिग बी लिहितात, “भारताच्या 22 भाषा धैर्य, विश्वास आणि सहानुभूतीचा महत्त्वाचा संदेश देत आहेत.”

व्हिडीओत आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाली, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेतील लोक फक्त धैर्य, विश्वास आणि सहानुभूती या 3 गोष्टींबद्दल बोलताना दिसत आहेत.

कोरोनामुळं आतापर्यंत 2500 लोक देशात दगावले आहेकत. तर 85 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. सध्या देशात तिसरा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.