वर्दीतील दर्दी गीतकाराच्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असलेले गीतकार डॉ. विवेक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘तुझा एक थेंब’ या ध्वनी चित्रफीतीचे प्रकाशन नुकतेच पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेशकर्णिक, जेष्ठ कवी अशोक नायगावकर, संमेलन अध्यक्ष डॉ. बी.जी. शेखर (पोलीस उपमहानिरीक्षक एसआरपीएफ) आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई सचिवालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित पहिल्या पोलीस साहित्य संमेलनात प्रख्यात गीतकार, पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले डॉ. विवेक मुगळीकर यांच्या स्वलिखित गीतांच्या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. यास संगीत आंनदी विकास यांनी दिले आहे. तसेच गायक धनश्री देशपांडे, महालक्ष्मी अय्यर, मंगेश बोरगावकर, हर्षिकेश रानडे, संदीप उबाळे यांनी ही गाणी गायली आहेत.

Loading...
You might also like