जलसंपदा विभागाचे हास्यास्पद विधान, म्हणे उंदीर, घुशी, खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र निर्माण झाले होते. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं. तर, सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली होती. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती. आता या परिस्थिती निर्माण करणारे गुन्हेगार समोर आले आहेत.

मुठा कालवा फुटल्याने शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत आणि 24 तासाच्या आत कालवा फोडणारे गुन्हेगार आले समोर आले आहेत. हे सराईत गुन्हेगार आहेत, उंदीर, घुशी आणि खेकडे. हो.. उंदीर, घुशी आणि खेकडे ! आता तुम्ही विचार कराल की हे कस शक्य आहे परंतु, हे विधान आम्ही नाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. या प्रकरणी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की उंदीर, घुशी आणि खेडऱ्यांनी हा कालवा पोखरल्याची माहिती आपल्याला अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गिरीश महाजन यांनी आज फुटलेल्या मुठा कालव्याला भेट दिली. त्यानंतर उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी कालवा फुटल्याचे अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं गिरीश महाजन म्हणाले. तरीही कालवा नक्की कशामुळे फुटला हे शोधण्यासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d3fe08f-c324-11e8-ac58-61d7f340d5fa’]

खडकवासल्यातून मुठेच्या कालव्यात पाणी सोडले जाते. तीन तालुक्यांच्या शेतीला पाणी पोहचते. पण त्याविरोधात उंदीर, घुशी, खेकड्यांनी कट केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात जितकी धरणं, कालवे आणि जलसाठे आहेत, तिथंही उंदीर, घुशी, खेकड्यांची कटकारस्थान सुरु आहेत का? याची चौकशी व्हायला पाहिजे. आता जलसंपदा विभागाने मुठा कालव्याचे गुन्हेगार शोधले आहे, पण त्याआधी खरी कारणंही होती ती बघा..

या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. तीन तालुक्यांच्या शेतीला पाणी जातं. पण त्याविरोधात उंदीर, घुशी, खेकड्यांनी कट केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात जितकी धरणं, कालवे आणि जलसाठे आहेत, तिथंही उंदीर, घुशी, खेकड्यांची कटकारस्थान सुरु आहेत का ? याची चौकशी व्हायला पाहिजे. आता जलसंपदा विभागाने मुठा कालव्याचे गुन्हेगार शोधले आहेत.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B075M6NM64′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3781752c-c324-11e8-9b89-d35d1a64427f’]

नेमकी खरी कारण आहेत काय, भिंत कोसळण्याचे –

खडकवासल्यातून निघणाऱ्या कालव्याची पूर्ण लांबी 35 किलोमीटर आहे
– 2006 पासून हा कालवा पाईपबंद करण्याचा प्रस्ताव आहे
– त्यामुळे कालव्याचं अंतर 35 किमीवरुन थेट 24 किमीवर येईल
– कालव्यातून जे 2.5 टीएमसी पाणी वाया जातं, तेही वाचेल
– याचा खर्च 1500 ते 2500 कोटीच्या घरात आहे
– पण कंत्राट कुणाला द्यायचं यावरुन वाद आहे आणि याचाच परिणाम कालव्याच्या भिंतीवर होऊन ती कोसळली आहे.

[amazon_link asins=’B075FY4RWK,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1245c07d-c324-11e8-b6d8-b3f231ea155b’]

संबंधित बातम्या

नागरिकांच्या मदतीला महिला पोलीस सरसावल्या
कालवा फुटलेल्या झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार : बापट
पुण्यात भर उन्हात पूर परिस्थिती , पाहणीसाठी आलेल्या महापौरांना घेराव
जनता वसाहत जवळचा मुठा कालवा फुटला ; गाड्यांचे नुकसान
‘या’ कारणामुळे दांडेकर पुलाजवळ दुर्घटना घडली
पुणेकरांचा रोष पाहून गिरीश महाजनांनी घेतला काढता पाय