मराठा आरक्षणावर आजच होणार सुप्रीम सुनावणी !

नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची (maratha reservation ) सुनावणी आज बुधवारीच होणार आहे. २५ जानेवारीपासून ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणारी सुनावणी आज घेण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील (maratha reservation ) स्थगिती आज उठवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या महिन्यात २० डिसेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली होती.

यावेळी मुकुल रोहतगी यांनी युक्तीवादात सांगितले की, शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. नोकरीमध्ये देखील आरक्षणण देण्याची गरज आहे. यावेळी न्यायमूर्तींनी मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी २५ जानेवारी २०२१ पासून सुरु होईल. तसेच घटनेत १०२ व्या घटना दुरुस्तीचा प्रश्न असल्याने न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरल यांना नोटीस बजावून वकिलांना लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितले होते. आता या घटनापीठापुढे आजपासूनच सुनावणी सुरु होणार आहे.