सांगली : मराठा मोर्चाकडून केरळ पुरग्रस्थांना मदत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चातर्फे यासाठी संपूर्ण राज्यातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात आली आहे. यामध्ये पुरग्रस्तांसाठी आवश्यक असणारा औषध साठा तसेच जिवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तू घेऊन मराठा क्रांतीचे एक पथक उद्या (मंगळवार) केरळमधील एर्नाकुलम येथे रवाना होणार आहे. या पथकामध्ये डॉक्टरांसह स्वयंसेवकांचा समावेश असणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आज (सोमवार) क्रांती मोर्चातर्फे मदत फेरी काढण्यात आली.
[amazon_link asins=’B01MUFADM4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78d8e9d2-a484-11e8-9332-3f20197c86ed’]
गडचिरोली, मुंबई, नागपूर, पुणे येथून क्रांती मोर्चातर्फे सांगलीतील समन्वयकांकडे मदत पाठविण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक उपचाराची सर्व प्रकारची औषधे, सॅनिटरी नॅपकीन, जीवनावश्यक वस्तू यांचा समावेश आहे. सोलापूर येथील मोर्चातर्फे चादर तसेच टॉवेल पाठवण्यात आले आहे. सर्व सामग्रीसह सहा डॉक्टर, पाच मदतनीस यांच्यास स्वयंसेवक अशी ४० जणांचे पथक एर्नाकुलम येथे मंगळवारी रवाना होणार आहे. एर्नाकुलमसह बारा किलोमीटरच्या परिसरात हे पथक पाच दिवस मुक्काम करून मदत करणार आहे. तसेच पथकाकडून आवश्यक सामग्रीची माहिती घेऊन दुसरे पथक नंतर पाठवण्यात येणार असल्याचेही क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. संजय पाटील, धनंजय वाघ, प्रशांत भोसले, विजय खेतरे, अंकित पाटील, रोहित शिंदे, प्रथमेश पाटील उपस्थित होते.