House wall collapsed in Pune | पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू, मध्यवस्तीतील घराची भिंत कोसळुन दोघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू झाल्यानंतर दुपारी मध्यवस्तीत एका घराची भिंत कोसळली (House wall collapsed in Pune ) असून, यात दोघेजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. House wall collapsed in Pune | It has been raining continuously since morning in Pune, the wall of a house in Madhyavasti collapsed, injuring two people

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

किशोर बबनराव रावडे (वय 52) व सीमा किशोर रावडे (वय 46) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. किरकोळ जखमी झाले आहेत.

pune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून ! प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू

अग्निशमन दलाकडून (Fire brigade) मिळालेल्या माहितीनुसार, रावडे कुटुंब खडकमाळ आळी येथील घर क्रमांक 646 येथे राहतात हे घर जुने आहे.
आज घराचे छत व भिंत अचानक कोसळली.
यावेळी दोघेही घरात असल्याने ते जखमी झाले आहेत.
पावसाने हा प्रकार घडला असावे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी धाव घेतली.
तसेच त्या दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान शहरात पावसाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात भिंत कोसळण्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे अग्निशमन दल तसेच पोलीस सतर्क झाले आहेत.

मध्यवर्ती अग्निशमन दलाचे प्रमोद सोनावणे, प्रदीप खेडेकर, पवार, गावडे, तुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.

Web Title : The wall collapsed in Pune | It has been raining continuously since morning in Pune, the wall of a house in Madhyavasti collapsed, injuring two people

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Vishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक