युवा पिढीने सेल्फी एैवजी मनाचा एक्स-रे काढावा : प्रतिभाकुंवरजी 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आधुनिकतेच्या आहारी जाऊन सेल्फीमध्ये गुंग झालेल्या युवा पिढीने ‘सेल्फी’ एैवजी ‘मनाचा एक्स-रे’ काढावा. आपल्या मनाचा एक्स-रे निरामय येण्यासाठी संत सान्निध्यात राहून मन स्वच्छ व सुंदर करावे. असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज यांनी निगडी येथे केले.

पवित्र चार्तुमास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ निगडी प्राधिकरण येथे प.पू.प्रफुल्लाकंवरजी महाराज यांचा मंगल प्रवेश झाला. यावेळी त्यांची आकुर्डी निगडी परिसरातून पारंपारिक वाद्यात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ प.पू.प्रफुल्लाजी महाराज, प.पू.चंदनाजी, प.पू.वसुधाजी, प.पू.नमिताजी तसेच उपमहापौर शैलजा मोरे, ‘अ’प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, माजी महापौर आर.एस.कुमार, अनुप मोरे, राजेंद्र बाबर, अमित गोरखे, उद्योजक सांकला, रमणलाल लुंकड, पारस मोदी, अशोक पगारिया, बाळासाहेब घोला, सुनिल महार, मोहलाल संचेती आदींसह पुणे, नाशिक, जळगाव, घोडनदी परिसरातून आलेले साधक उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07944CZ7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2d7fe6e-8d04-11e8-89ba-83471a4ebb35′]
प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा. मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, सत्संगात मोह, माया पासून दूर राहून प्रभू दर्शनाचा आनंद मिळतो. सत्संगाने संसारी माणसाला सम्यक दृष्टी, सम्यक श्रद्धा आणि पूर्ण विश्वास प्राप्त होऊन जीवनातील अंध:कार संपुन प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल सुरु होते. या अनंत काळाच्या जीवन चक्रातून जीवनातील पूर्णानंद मिळवून मानवाची मोक्षप्राप्तीकडे वाटचाल सुरु होते आणि सदगुरुंच्या सानिध्यात राहुन मोक्षप्राप्तीचा मार्ग सापडतो.
गुरुवारी दि. 27 जुलै पासून रोज सकाळी नऊ वाजता निगडी प्राधीकरण येथील पाटीदार भवनमध्ये प.पू.प्रतिभाकंवरजी महाराज आणि प.पू.प्रफुल्लाजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. साधकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, सुत्रसंचालन सुभाष ललवाणी आणि शारदा चोरडिया तसेच आभार मनोहरलाल यांनी मानले.