Theft In Pune Collector Office | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील संगणकाची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Theft In Pune Collector Office | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेतील पीटीबी संकलन या कार्यालयातून संगणक चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत घडला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी (Bund Garden Police Station) अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी महसूल सहायक दिपक साहेबराव शिंदे (वय-49 रा. आंबेगाव पठार) यांनी गुरुवारी (दि.28) बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या ताब्यातील संगणक जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेतील पीटीबी संकलन या कार्यालयात ठेवला होता. 5 नोव्हेंबर 2023 ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत अज्ञात चोरट्याने संगणक चोरुन नेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हॉटेलमधून महागड्या सामानाची चोरी

पुणे : साधु वासवानी चौकातील (Sadhu Vaswani Chowk) हॉटेल वुडलँड लॉजींग (Hotel Woodland Lodgings)
येथे काम करणारा रुमबॉय याने हॉटेलमधील महागड्या वस्तू चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हरिष विनोद बँकर (वय-69 रा. बाबाजान चौकाजवळ, कॅम्प, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद
दिली आहे. यावरुन गोवींद गावडे (वय-35 रा. सोपान नगर, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी गावडे याने हॉटेलमधील पहिल्या मजल्यावरील नुतनीकरणासाठी बंद असलेल्या खोलीतून वॉश बेसीन, शॉवर, स्पॉट,
ओव्हर हेड शॉवर असा एकूण 46 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार गुरुवारी (दि.28) रात्री आठच्या
सुमारास उघडकीस आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास