…..तर पेट्रोल मिळेल ५५ रुपयांत नितीन गडकरी यांनी दाखविले स्वप्न

रायपूर: वृत्तसंस्ठा

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल ५० आणि पेट्रोल ५५ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होईल, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कच-यापासून तयार करण्यात येणा-या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असेही गडकरी म्हणाले. ते छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात बोलत होते.

आपण तब्बल ८ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतच आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होत आहे. अशा परिस्थितीत इथेनॉल निर्मितीमुळे मोठा दिलासा मिळेल, असे गडकरी यांनी म्हटलं. ‘मी गेल्या १५ वर्षांपासून देशातील शेतकरी, आदिवासींना इथेनॉल, मेथानॉल आणि जैव इंधनाच्या उत्पादनाचे महत्त्व सांगत आहे’, याचीही आठवण त्यांनी करुन दिली.

[amazon_link asins=’B008V6T1IW,B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0263f9be-b58e-11e8-9912-abc51dc8fa1b’]
छत्तीसगडमध्ये जैव इंधनाचे केंद्र्र होण्याची क्षमता असल्याचे गडकरी म्हणाले. ‘नागपुरात जवळपास एक हजार ट्रॅक्टर जैव इंधनावर चालतात. या क्षेत्रात आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून वाहन चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा प्रयोगांना आणखी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. छत्तीसगड कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात समृद्ध आहे. राज्यात गहू, तांदूळ, ऊस आणि डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे छत्तीसगड जैव इंधन निर्मितीत मोठी कामगिरी करु शकते,’ असं गडकरी म्हणाले.