देशात कोणतीच मंदी नाही, फक्त काही क्षेत्रांमधील मागणी कमी : SBI चे चेअरमन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसबीआय बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी शनिवारी म्हंटले की देशात काही क्षेत्रांमध्ये मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. जसे की ऑटो मोबाइल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी कमी झाली आहे मात्र याला आपण मंदी नाही म्हणू शकत. त्यांनी सांगितले की जास्ततर बँकांमध्ये कॅशमध्ये चलन उपलब्ध आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये चलन फ्लो करण्याची गरज आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम भारतावरही

गुवाहाटी येथील कार्यक्रमात रजनीश कुमार यांनी सांगितले की, भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा हिस्सा आहे त्यामुळे जागतिक घडामोडीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३२ उपाययोजना सांगितल्या आहेत त्या देशासाठी खूप महत्वाच्या ठरणार आहेत.

ऑटो सेल्स मधील घसरण हा ग्लोबल ट्रेंड

SBI सारख्या बँक सुविधाजनक आहेत. मात्र यावेळेस क्रेडिट फ्लोची गरज आहे. एग्रीगेटर मॉडेल ला घेऊन एक नवा ट्रेंड आला आहे. लोक आता स्वता:ची गाडी घेण्यापेक्षा ओला, उबेर सारख्या कॅब करून जातात या ग्लोबल ट्रेंड मुळेच ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी घसरण झाली असल्याचे एस बी आयचे चेअरमन यावेळी म्हणाले.

दुसरी सहामायी अर्थव्यवस्थेसाठी उत्तम

येणार सणांचा उत्सव आणि सरकारच्या चांगल्या धोरणांमुळे येणाऱ्या काळात चांगलीच प्रगती होईल. येणारी अर्थव्यवस्था ही बँकिंगसाठी चांगली असेल. सरकारने क्रेडिट फ्लोची केलेली घोषणा पूर्ण झाल्यास प्रायव्हेट सेक्टरमध्ये पुन्हा तेजी येईल. अशाप्रकारे एस बी आय बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी अर्थव्यवस्थेबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या