‘त्या’ महिलेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून दीड लाख रुपयांचा धनादेश

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवंता सुरेश बोडेकर या महिलेला दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. मुठा उजव्या कालव्याला भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेत बोडेकर यांच्या घरातील दीड लाख रुपये वाहून गेले होते. बोडेकर यांचे पती हमाली काम करतात. मुलांची फी भरण्यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी उसने आणलेले दीड लाख रुपये घरात ठेवले होते. कालवा फुटल्यानंतर आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात दांडेकर पुल झोपडपट्टीतील त्यांचे सर्व साहित्य आणि पैसे वाहून गेले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03c2ce78-c2f3-11e8-a714-b1d45bb6ebff’]

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यासंदेर्भातील वृत्त वाचल्यानंतर बोडेकर यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यास सांगितले होते. त्यानुसार तातडीने हा धनादेश आज सुपूर्द केल्याचे डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेनेचे नितीन बानगुडे पाटील, राजेंद्र शिंदे, सूरज लोखंडे आदी उपस्थित होते. आज संध्याकाळी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B01HQ4NZE0,B073FKXQ9H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1528153f-c2f3-11e8-b230-a392c40a1228′]

संबंधित बातम्या

नागरिकांच्या मदतीला महिला पोलीस सरसावल्या
कालवा फुटलेल्या झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार : बापट
पुण्यात भर उन्हात पूर परिस्थिती , पाहणीसाठी आलेल्या महापौरांना घेराव
जनता वसाहत जवळचा मुठा कालवा फुटला ; गाड्यांचे नुकसान
‘या’ कारणामुळे दांडेकर पुलाजवळ दुर्घटना घडली