Bigg Boss 13 : स्पर्धकांची यादी जाहीर, ‘या’ सीजनमध्ये दिसणार ‘हे’ स्टार्स !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लहान पडद्यावरील सर्वात चर्चित आणि विवादित रिअ‍ॅलिटी टीव्ही शो बिग बॉस पुन्हा एकदा वापसीसाठी तयार आहे. आज रात्री 9 वाजता कलर्स टीव्हीवर शोचा पहिला एपिसोड प्रसारीत केला जाणार आहे. या शोमधील स्पर्धकांची अधिकृत यादी समोर आली आहे. या वेळी यात 13 स्पर्धक असणार आहेत.

1) देवोलिना भट्टाचार्य(टीव्ही अ‍ॅक्ट्रेस)-
स्टार प्लसवरील चर्चित शो साथ निभाना साथिया मध्ये देवोलिनाने गोपी बहुची भूमिका साकारली होती. तिने या शोमध्ये जिया मानिकला रिप्लेस केलं होतं. तिची हिंदी एवढी खास नाही. परंतु ती सर्वात लोकप्रिय अ‍ॅक्ट्रेसपैकी एक बनली आहे. तिने सिंगिंग आणि डान्सिंगमध्ये नशीब आजमावलं आहे.

2) आरती सिंह(टीव्ही अ‍ॅक्ट्रेस)-
गृहस्थी आणि वारीस सारख्या शोमध्ये काम करणारी आरती सिंह देखील यावर्षी या टीव्हीशोमध्ये दिसणार आहे. आरती चर्चित कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहिण आणि गोविंदाची भाची आहे.

3) माहिरा शर्मा(टीव्ही अ‍ॅक्ट्रेस)-
नागिन आणि कुंडली भाग्य सारख्या टीव्ही मालिकेत काम करणारी माहिरा शर्मा जम्मूची आहे. तिने म्युझिक व्हिडीओ आणि कमर्शियल्समध्ये काम केलं आहे. ती एक टीकटॉक स्टार आणि सोशल मीडिया सेलेब्रिटी आहे. ती शेवटची लहान पडद्यावर एमटीव्ही वरील ए डेट टु रिमेंबर मध्ये दिसली होती.

4) कोएना मित्रा(फिल्म अ‍ॅक्ट्रेस) –
रोड, मुसाफिर आणि खिलाडी एक हसीना यांसारखे सिनेमे करणारी कोएना दीर्घकाळानंतर स्क्रिनवर दिसणार आहे. कोलकात्यात जन्मलेली ही अभिनेत्री अनेक ब्युटी पेनजेंट जिंकली आहे. आपल्या सर्जरींमुळे ती अनेकदा वादात सापडली होती. बिग बॉस तिच्यासाठी मोठी संधी ठरू शकतो.

https://www.instagram.com/p/B29NcoLAuXr/

5) रश्मी देसाई-
भोजपुरी सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या रश्मी देसाईचं खरं नाव दिव्या देसाई आहे. उतरन सारख्या मालिकांमुळे रश्मी प्रसिद्ध झाली. रश्मीने निगेटीव रोलमुळे खूप लोकप्रियता मिळवली. आपला कोस्टार नंदिश संधू सोबत रिलेशनशिपमुळे ती चर्चेत राहीली. शो संपल्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोटही झाला. यानंतर ती सिद्धार्थ शुक्ला सोबत लिंकअप झाली होती. नंतर दोघे वेगळे झाले. यावेळी ती पुन्हा बिग बॉसमध्ये सिद्धार्थसोबत दिसणार आहे. असे समजत आहे की, रश्मीचा आत्ताचा बॉयफ्रेंड अरहानही शो जॉईन करणार आहे.

6) पारस छाबडा –
रिअ‍ॅलिटी टीव्ही शोज आणि सिनेमात काम केलेला पारस आपल्या अफेअर्समुळे खूपच चर्चेत राहिला आहे. दिल्लीचा हा अ‍ॅक्टर हा स्प्लिट्सविला 5 चा विनर आहे. सारा खान सोबत तो दीर्घकाळ नात्यात राहिला आहे. नंतर तो पवित्र पुनियाला घेऊन चर्चेत आला. सध्या तो आकांक्षा पुरीला डेट करत आहे. वादाने भरलेलं असं त्याचं आयुष्य आहे.

7) शेफाली बग्गा(न्यूज अँकर)-
बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी न्यूज अँकर शोमध्ये दिसणार आहे. शेफाली इंडिया टुडे ग्रुपचा चॅनल तेजवर न्यूज अँकर आहे. ती इंडिया टुडे मीडिया इंस्टीस्ट्युटची स्टुडेंट आहे. तिचं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. दिल्लीची शेफाली फिटनेस फ्रिक आहे.

8) दलजीत कौर-
झी टीव्हीवर प्रसारीत होणारा टीव्ही शो गुड्डन तुमसे ना हो पाएगा क्विट करणारी अ‍ॅक्ट्रेस दलजीत या सीजनमध्ये दिसणार आहे. अशीही चर्चा आहे की, तिचा एक्स हसबंड शालीन भनोट शोचा हिस्सा बनू शकतो.

9) असीम रिजाय-
शो मध्ये दिसणाऱ्या आय कँडी बद्दल बोलायचे झाले तर तो म्हणजे असीम रिजाय. असीम एक चॉकलेट बॉय आहे. जो या शोमधील फीमेल कंटेस्टेंट्ससाठी इंट्रेस्ट बनू शकतो. तो एक फिटनेस मॉडेल आहे आणि त्याचे फोटो सोशलवर नेहमीच पसंत केले जातात.

image.png

10) शहनाज कौर गिल (पंजाबी अ‍ॅक्ट्रेस, मॉडेल आणि सिंगर)-
शहनाज कौर गिलचे गाणे खूपच लोकप्रिय आहेत. वादग्रस्त सेलेब्रिटी शहनाज पंजाबी अ‍ॅक्ट्रेस, मॉडेल आणि सिंगर आहे.

https://www.instagram.com/p/B0_U9qUhp6Q/

11) सिद्धार्थ शुक्ला-
हा तो अभिनेता आहे जो आपल्या अ‍ॅक्टींग स्किल्सपेक्षा ऑफ स्क्रिन लाईफसाठी प्रसिद्ध आहे. बालिका वधू, खतरों के खिलाडी आणि दिल से दिल तक त्याच्या लोकप्रिय मालिका आहेत. हंप्टी शर्मा की दुल्हनिया मधून त्याने मोठ्या पडद्यावर डेब्यू केला होता. या सिनेमात ते वरुण धवन आणि आलिया भट्टसोबत दिसला होता. यानंतर सिद्धार्थ मारामारी आणि कलीग्ससोबत उद्धटपणे वागण्यामुळे चर्चेत येऊ लागला. रश्मी देसाई आणि जॅस्मिन भसीन सोबत त्याचं लव हेट रिलेशनशिप खूप चर्चेत राहिलं. या दोघीही दिल से दिल तक मध्ये त्याच्या कोस्टार होत्या. तो मिस्टर फ्लर्ट आणि शॉर्ट टेंपरमुळे बदनाम आहे.

https://www.instagram.com/p/BXzlBzcBJ0B/

12) अबु मलिक(म्युझिक कंपोजर)-
अबु मलिक चर्चित म्युझिक डायरेक्टर आणि अनु मलिकचा लहान भाऊ आहे. तो काहीसा आपल्या मोठ्या भावासारखाच दिसतो. तो म्युझिक कंपोजर आणि शो ऑर्गनायजर आहे. त्याने Rantings नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे.

13) सिद्धार्थ डे(रायटर)-
सिद्धार्थ एक जबरदस्त रिअ‍ॅलिटी शो रायटर राहिला आहे. तो सलमानच्या खूपच क्लोज आहे कारण तो सलमान खानच्या सर्व वर्ल्ड टूर ट्रीपसाठी स्क्रिप्ट लिहितो.
EXCLUSIVE: आ गई बिग बॉस कंटेस्टेंट्स की लिस्ट, सीजन 13 में दिखेंगे ये सितारे

Visit : policenama.com