तुमच्या फोनमध्ये ठेऊ नका ‘हे’ 5 अ‍ॅप्स, यांच्याद्वारे होऊ शकते ‘हॅकिंग’, जाणून घ्या

नवी दिल्ली : तुम्ही एखाद्या कंपनीचा कस्टमर केयरचा नंबर गुगलवर कधी ना कधी सर्च केला असेल. परंतु, हे माहिती आहे का की, गुगलवर कस्टमर केयर नंबर(Google Customer Care) सर्च केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. होय, सध्या इंटरनेट यूजर्ससोबत कस्टमर केयर स्कॅमची संख्या वेगाने वाढत आहे. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत. की, हे कस्टमर केयर स्कॅम आहे काय?

आपल्याला जेव्हा एखाद्या कंपनीच्या कस्टमर केयर नंबरची आवश्यकता असते, तेव्हा गुगल सर्च करतो. गुगलवर जेव्हा नंबर मिळतो, तेव्हा आपण त्यावर डायल करून त्याचा वापर करतो.

तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, अनेकदा हे कस्टमर केयर नंबर खरे कस्टमर केयर नंबर नसतात, तर सायबर गुन्हेगारांनी नोंदवलेले असतात, ज्याचा हेतू फसवणूक करण्याचा असतो.

हे सायबर गुन्हेगार यूजरवर दबाव आणून त्यांना त्याच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये रिमोट डेस्कटॉप अ‍ॅप डाऊनलाड करण्यास सांगतात. जर यूजरने असे केले तर त्याच्या फोनचा पूर्ण अ‍ॅक्सेस घेतला जातो, किंवा यूजरच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरी केले जातात. हे सायबर गुन्हेगार फोनची स्क्रीन रेकॉर्ड करतात आणि ओटीपीसह यूपीआय लॉगइन डिटेल्स चोरतात.

रिमोट डेस्कटॉप अ‍ॅप्स मालवेयर नसतात. यूजरने ते कसे वापरायचे हे शिकून घेतल्यास कोणतीही अडचण येणार नाही. हे लक्षात ठेवा की, कस्टमर केयर एग्झीक्युटिव्ह तुम्हाला कधीही कोणतेही रिमोट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगत नाही. फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही सुद्धा रिमोट अ‍ॅप डाऊनलोड करा.

आम्ही काही अ‍ॅप्सची माहिती देणात आहोत, ज्याद्वारे तुमच्या अकाऊंटमधून पैसे चोरले जाऊ शकतात

TeamViewer QuickSupport :
आयटी मॅनजर याचा वापर कम्प्युटर किंवा फोन कंट्रोल करण्यासाठी करतात. हे अ‍ॅप तुम्ही तेव्हा डाऊनलोड करा जेव्हा ते तुम्हाला वापरण्याची माहिती असेल.

Microsoft Remote desktop :
हे अ‍ॅपसुद्धा खुप कामाचे आहे आणि यूजर्सला पीसी किंवा व्हर्च्युअल अ‍ॅप्सला रिमोटली कनेक्ट करण्याची परवानगी देते. हॅकर्ससुद्धा याचा खुप वापर करतात. याचा वापर तेव्हाच करा जेव्ह याच्याबाबत माहिती असेल.

AnyDesk Remote Control :
हे बिजनेस यूजर्स वापरतात. याद्वारे सुद्धा डेस्कटॉपला रिमोटली अ‍ॅक्सेस केले जाते. ऑनलाइन फसवणूकीसाठी सायबर गुन्हेगार याचाही वापर करतात. याची पूर्ण माहिती असेल तेव्हाच ते डाऊनलोड करा.

AirDroid :
हे अँड्रॉइड फोनमध्ये वापरले जाते. हे सुद्धा एक रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप आहे. माहितीशिवाय हे डाऊनलोड करू नका.

AirMirror :
हे पीसीद्वरे तुमच्या फोनला अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा देते. वापरायची माहिती असल्याशिवाय हे डाऊनलोड करू नका.