जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शक्यतो लोकांचे कमी वयातच केस गळत असल्याचे दिसून येते. केस गळण्याआधी केस पातळ होण्यास सुरुवात होते आणि मग केस गळतीला सुरुवात होते. केस गळती होत असल्याने ती लपवण्यासाठी लोक विविध औषधे घेतात, आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. जर तुमचे दिवसभरात 200 पेक्षा आधिक केस गळत असेल तर तुम्ही केसगळतीचे शिकार झाला आहात.

शरीरात थायरॉयिडचे प्रमाण कमी झाल्याने किंवा असंतुलित झाल्याने केस गळण्यास सुरुवात होते. थायरॉयिडच्या कमी होणाऱ्या प्रमाणामुळे केसाच्या गुणवत्तेत आणि वाढीत अडथळा येऊ शकतो.

डॉक्टरांचा सल्ला घ्या –
यात कोणतीही शंका नाही की आधिक ताण घेतल्याने केस गळण्यास सुरुवात होते. काही वेळा आरोग्याच्या कारणाने देखील केस गळतीचे प्रमाण वाढते. अशा वेळी केसाची ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इंफेक्शनमुळे केसांची होणारी गळती धोकादायक समजली जाते. केस गळण्याची कारणं, रिंगवर्म किंवा एथलीट फुटचे इंफेक्शन असू शकते. अशा प्रकारचे इंफेक्शन संपर्कातून देखील होते. त्यामुळे कोणाचाही कंगवा वापरताना, केस पुसायला टॉवेल वापरताना जरा जपूण वापरा किंवा वापरूच नका. कारण त्यामुळे आधिक केस गळती होऊ शकते.

औषधाच्या सेवनाने होते केस गळती –
तसेच स्टेरॉईड, एंटीडीपेंटेट्स आणि आयसोट्रेटिनॉइन याचे सेवनातील प्रमाण वाढल्याने या औषधांच्या सेवनाने तुमचे केस गळू शकतात. त्यामुळे असा औषधांचे सेवन टाळल्यास केसगळती थांबू शकते.

फेसबुक पेज लाईक करा –