Airtel च्या ‘या’ ग्राहकांना मिळणार मोफत रिचार्ज, जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाचे संकट असून अद्याप ते संपलेले नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी टेक जगतातील अनेक कंपन्यांनी पुढे येऊन आर्थिक मदत केली आहे. देश विदेशातील कंपन्या भारताला मदत करत आहेत. देशातील दिग्गज नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी भारती एअरटेल आपल्या ग्राहकांना फायदा पोहोचवण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. कंपनीने नुकतेच लो इन्कम असणाऱ्या ग्राहकांसाठी या महामारीत आपल्या नेटवर्कशी जोडलेले रहावे यासाठी एक खास फायद्याची घोषणा केली आहे.

कंपनीकडून प्रीपेड ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एअरटेलकडून 49 रुपयांचं रिचार्ज मोफत देण्यात येणार आहे. ही वन टाईम ऑफर असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 5.5 कोटी ग्राहक हे कमी उत्पन्न गटातील आहेत. ज्यांना कोरोनामुळे कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हा प्लॅन त्यांना वेळीच फायदा देऊ शकेल असं कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये दुप्पट बेनिफिट्स देण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलच्या 49 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना 100 एमबी डेटा मिळतो. व्हाईस कॉलिंग साठी 38 रुपयांचा टॉकटाईम मिळतो. या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. आपल्या या योजनेद्वारे कंपनी आपल्या 5.5 कोटीहून जास्त ग्राहकांना मजबूत बनवणार आहे. यात जास्तीत जास्त ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत.

सध्या कोरोनामुळे कठीण काळ आहे. या काळात ग्राहकांना आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारांसोबत जोडलेले रहावे यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना 79 रुपयांच्या रिजार्जमध्ये डबल फायदे देत आहे. 45.8 कोटी पेक्षा जास्त ग्राहकासोबत कंपनी साउथ आशिया आणि आफ्रिकासह 18 देशात काम करत आहे. एअरटेलच्या 79 रुपयांच्या प्लानमध्ये 200 एमबी डेटा मिळतो. 28 दिवसांची वैधता मिळते. यात व्हॉइस कॉलिंगसाठी 38 रुपयांचा टॉकटाइम मिळतो.