बॉलिवूडमधील ‘या’ ५ अभिनेत्रींनी केलं विवाहित पुरुषाशी ‘लग्न’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या विवाहबद्ध झाल्या तेव्हा त्यांच्या आयुष्यातील ते पहिलं लग्न होतं. परंतु ज्यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं ते पुरुष किंवा सेलिब्रिटी मात्र विवाहित होते. आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी विवाहित पुरुषाशी लग्न केलं आहे.

1) करीना कपूर- करीना कपूर ही अभिनेत्रा सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. सैफ 1991 साली अमृता रावसोबत विवाहबद्ध झाला होता. परंतु त्यांचे नाते टिकले नाही. 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. सैफला अमृता रावपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. 2012 मध्ये सैफने करीनासोबत लग्न केले. करीना आणि सैफला तैमूर नावाचा मुलगा आहे.

2) हेमा मालिनी- हेमा मालिनी यांनी 1979 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं. परंतु त्याआधीच त्यांचं एक लग्न झालं होतं. प्रकाश कौर असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि अहाना अशी दोन मुली आहेत. हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला.

3) श्रीदेवी- अभिनेत्री श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. श्रीदेवी या बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. बोनी यांचं मोना कपूर यांच्याशी एक लग्न झालं होतं. बोनी आणि मोना कपूर यांना अंशुला आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. तर श्रीदेवी आणि बोनी यांना खुशी आणि जान्हवी अशा दोन मुली आहेत.

4) शिल्पा शेट्टी– शिल्पा शेट्टीने राज कुंद्रा यांच्योसबत 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. राज कुंद्रा एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तु्म्हाला सांगू इच्छितो की, राज कुंद्रा यांचं आधीही लग्न झालं होतं. कविता असं त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. राज आणि कविता यांना एक मुलगी आहे. देलिना असं त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीचं नाव आहे. खूप कमी लोकांना हे ठाऊक आहे शिल्पा राज यांची दुसरी पत्नी आहे. राज आणि शिल्पा यांना विहान नावाचा एक मुलगा आहे.

5) किरण राव- किरण राव यांनी आमिर खान सोबत लग्न केलं. आमिर आणि किरणची जोडी सध्या बॉलिवूडमधील यशस्वी जोडी असली तरी किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी आहे. रिना दत्ता असं आमिर खानच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, किरण राव आणि रिना दत्ता या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

अवघ्या २ रुपयांत कॅन्सरवर उपचार शक्य, एका डॉक्टरचा दावा