‘या’ ५ टॉप अभिनेत्रींचं होतं अंडरवर्ल्डशी ‘कनेक्शन’, एकीचं तर नशीबच ‘फुटलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप खोल आहे आणि ते कोणापासूनही लपलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे अंडरवर्ल्ड डॉन यांच्यावर प्रेम होते आणि डॉनचे ही अनेक अभिनेत्रीवर प्रेम होते. त्यांच्या सुंदरतेवर डॉन फिदा झाले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

मंदाकिनी
१९८५ मध्ये राज कपूरचा चित्रपट ‘राम तेरी गंगा मैली’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्री एका रात्रीत स्टार बनली होती. या अभिनेत्रीचे नाव यास्मीन जोसेफ म्हणजेच चित्रपटातील मंदाकिनी जी ९० च्या दशकात आपल्या अफेअरमुळे चर्चेमध्ये आली होती. मंदाकिनीचे नाव त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत जोडले गेले होते. यांच्या नात्याच्या स्फोट त्यावेळी झाला. ज्यावेळी या दोघांचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. मंदाकीनीने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि दाऊद रिलेशनशिपमध्ये नव्हते.

मोनिका बेदी
बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी ही चित्रपटांपेक्षा दाऊदचा खूप जवळचा व्यक्ती अबू सलेम यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेमध्ये होती. ती अबू सलेमसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे खूप चर्चेमध्ये होती. या प्रेमापोटी तिला कारागृहात देखील जायला लागले. एका मुलाखतीत मोनिकाने सांगितले की, अबू सलेम यांनी आपल्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल मला काहीच सांगितले नव्हते. अबूने मला त्याचे खरे नाव देखील नव्हते सांगितले. तरी देखील मी प्रेमात पडले होते. जेव्हा मोनिकाला पोलिसांनी पकडले. तेव्हा तिला सगळे खरे कळाले.

ममता कुलकर्णी
बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रीच्या रुपात ओळखली जाणारी ममता कुलकर्णीने जितक्या वेगाने चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले. तेवढ्याच वेगाने तिच्या करिअरचा शेवट झाला. ममताचे नाव अंडरवर्ल्डसोबत जोडले गेले होते. एवढेच नव्हे तर ड्रग माफिया विक्की गोस्वामी यांच्यासोबत ममताची जवळीक वाढली होती. यानंतर दोघांनी लग्न केले. २०१६ मध्ये ममता कुलकर्णीला केन्या एयरपोर्टवर पती विक्की गोस्वामी यांच्यासोबत ड्रग्स तक्ररी प्रकरणात पोलिसांनी अटक केले. यानंतर ममताची चौकशी करुन पोलिसांनी तिला सोडले.

सोना
बॉलिवूड अभिनेत्री सोना आणि हाजी मस्तान यांचे नाते खूप चर्चेमध्ये होते. हाजी मस्तानने पहिल्यांदा त्यांच्या प्रोडक्शनच्या एका चित्रपटात पाहिले होते. त्याचवेळी त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचे ठरविले. लग्नाची प्रस्ताव घेऊन हाजी मस्तान सोनाच्या आईकडे गेले. सोनाने यांच्या प्रस्तावाचा स्विकार केला. दोघांचे लग्न झाले. दोघांचे लग्न झाल्यानंतर डॉनच्या मृत्यूनंतर सोना खूप एकटी पडली.

अनीता अयूब
अनीता अयूब पाकीस्तानची अशी एक अभिनेत्री आहे. जिचे नाव दाऊद सोबत जोडले गेले होते. दाऊद आणि अनीता यांचे प्रेमप्रकरण लोकांना त्यावेळी कळाले. ज्यावेळी निर्माता जावेद सिद्दकी यांची हत्या झाली. या हत्येचे कारण असे सांगितले गेले की, जावेदने अनीताला चित्रपटामध्ये कास्ट करण्यासाठी नकार दिला होता.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार