सनी लिओनी अन् प्रियंका चोपडासह ‘या’ 5 अ‍ॅक्ट्रेसनं Bold सीन्सच्या नावाखाली केली प्रेक्षकांची दिशाभूल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सिनेमात बोल्ड सीन देणं आजकाल कॉमन गोष्ट झाली आहे. आपण अनेक अ‍ॅक्ट्रेसला बोल्ड सीन्स देताना पाहून चकितही झाला असाल. परंतु तुम्हाला माहीत आहे का, यासाठी अनेकदा बॉडी डबलचा वापर केला जातो. फक्त कॅमेऱ्याचा अँगल मात्र असा असतो की, कोणालाही लक्षात येत नाही की, ती अभिनेत्री नसून दुसरीच व्यक्ती आहे.

1) सनी लिओनी (एक पहेली लीला) – तुम्ही सनीला अनेक सिनेमात बोल्ड सीन्स देताना पाहिलं असेल. परंतु सनीदेखील अशा सीन्ससाठी घाबरते. एक पहेली लीला सिनेमात तिनंही डुप्लिकेटचा वापर केला आहे. सनीला मोहित अहलावतसोबत बोल्ड सीन्स द्यायचे होते. परंतु तिनं डॅनियल सोबत हे सीन शूट केले.

2) मल्लिका शेरावत (हिस्स) -2010 साली आलेल्या या सिनेमातील बोल्ड सीन्स चर्चेत राहिले होते. यातील मातीच्या आतील सीन मल्लिकाच्या डुप्लिकेटनं शूट केला होता.

3) सीमा बिस्वास (बँडेड क्वीन) -फुलन देवीच्या जीवनावरील बँडेड क्वीन सिनेमावर अनेकांनी टीका केली. पण त्यानंतर सिनेमाला यश मिळालं. सिमा बिस्वासनं यात फुलन देवीची भूमिका साकारली होती. यात एक न्यूड सीन होता जो तिच्या डु्प्लिकेटेनं शूट केला होता.

https://www.instagram.com/p/B7uyl4oBjAK/

4) मनीषा कोईराला (एक छोटीसी लव्ह स्टोरी ) – 2002 साली आलेल्या या सिनेमातही मनीषाच्या बोल्ड सीन्ससाठी बॉडी डबलचा वापर झाला होता.

5) प्रियंका चोपडा (7 खून माफ) – 2011 साली आलेल्या या सिनेमातील एका सीनमध्ये प्रियंका टॉपलेस दिसली होती. परंतु हा सीन प्रियंकानं नव्हे तर तिच्या डुप्लिकेटनं केला होता.