भारतातील ‘या’ मंदिरांचे गूढ आजही आहेत कायम

वृत्तसंस्था : वैविध्यपूर्ण पंथांना, संप्रदायांना, समाजांना आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे आणणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्मात मंदिरात जाणे, पूजा पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काहींना या श्रद्धेतून वेगवेगळे अनुभव आल्याचे बरेचसे दाखले आहेत. त्याच बरोबर भारतात असे काही मंदिर आहेत. जे फक्त इच्छापूर्तीसाठीच नाही. तर आपल्या अनोख्या चमत्कारिक विशेषतेमुळे ओळखले जातात. या चमत्कारांवर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र मंदिरांबाबतच्या काही खास गोष्टी ऐकल्यावर आपण विचारात पडाल एवढे मात्र निश्चित आहे.

करणी माता मंदिर (उंदीरांचे मंदिर) 

करणी माता मंदिर राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात स्थित एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.येथे देवी करणी मातेचा पुतळाआहे. बीकानेर पासून जवळपास 30 किमी अंतरावर दक्षिणेस, देशनाक येथे हे मंदिर असून.या मंदीरात भक्तांच्या गर्दीपेक्षा काळ्या उंदरांचा सुळसुळाट जास्त असल्याने या मंदिराला उंदीरांचे मंदिर असे देखील संबोधले जाते. येथील सर्व काळ्या उंदरांमध्ये ज्या भक्ताला पांढरा उंदीर दिसेल. त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी तेथील भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे या मंदिरात मांजर कधीही प्रवेश करत नाही. आणि दर्शन करून मंदिरा बाहेर तुम्ही आलात की तुम्हाला एकही उंदीर मंदिर आवारात दिसत नाही.
कामाख्या देवी मंदिर

कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटी येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर असून आसामची राजधानी दिसपूर येथून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत ते स्थित आहे. हे मंदिर दगडात कोरलेले असून. तेथे देवीची प्रतिमा आहे जेथे देवाची प्रतिमा आहे तिथेच देवीला वस्त्रे, आभूषणे, भोग चढविला जातो. एका डॊंगरावर असलेल्या या मंदिराचे तांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व असल्याने देशभरातून अनेक तांत्रिक मांत्रिक लोक येथे देवीच्या पूजेसाठी येत असतात. हे देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असून येथील देवीचे मंदिर योनी स्वरूपात आहे.
कालभैरव मंदिर

काल भैरव मंदिर उज्जैन येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. जे भगवान काल भैरव यांना समर्पित आहे. ते उज्जैन शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असून हे जगातले एकमेव असे मंदिर आहे की,जेथे देवाला नैवेद्य म्हणून दारू अर्पण केली जाते. अर्पण केलेली दारू कुठे जाते याचा अजूनही शोध लागलेला नाही.
मेहंदीपुर हनुमान मंदिर

मेहंदीपूर बालाजी हे मंदिर राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे. हे हनुमान जीचे प्रसिद्ध मंदिर असून. हे ठिकाण दोन टेकड्यांमध्ये अतिशय आकर्षक दिसते. भूतबाधेने त्रस्त झालेले हजारो लोक या मंदिरात दररोज दर्शनासाठी येतात. भूतबाधेने पिडीत असलेल्या व्यक्तीला हे मंदिर स्वतःच्या घराप्रमाणे वाटते.आणि श्री बालाजी या संकटातून मुक्ती देतील अशी त्याची शेवटची आशा असते. येथे अनेक लोक साखळदंडामध्ये बांधलेले आणि उलटे लटकलेले दिसून येतात. हे मंदिर आणि येथील चमत्कार पाहून कोणताही व्यक्ती चकती झाल्याशिवाय राहत नाही.ज्यावेळी  भगवान बालाजीची आरती करण्यात येते. त्यावेळी पीडित लोक एकमेकांशी झुंज खेळतात.तेथील पुजारी त्यांच्यावर उपाय करता आणि ती व्यक्ती. ठीक होते.