‘चेअर कार’ असलेल्या ‘या’ रेल्वे गाडयांच्या तिकीट दरात 25 % कपात, ‘वंदे भारत’ आणि ‘शताब्दी एक्सप्रेस’मध्ये देखील ‘सुट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीटिंग चेअर असणाऱ्या रेल्वेच्या तिकीटदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून जवळपास 25 टक्के तिकिटांच्या किमतींमध्ये कपात होणार आहे.

कपात करण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये शताब्दी, गतिमान, तेजस, डबल डेकर, इंटरसिटी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. मात्र जर त्या रेल्वेच्या 50 टक्क्यांपर्यंत जागा बुक झाल्या असल्यासच याचा लाभ देण्यात येणार आहे. 30 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणार असून खासगी ट्रॅव्हल गाड्या आणि विमान कंपन्यांकडून कमी दरात मिळणाऱ्या तिकिटांना टक्कर देण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना प्रस्ताव पाठवला असून यामध्ये या नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र 25 टक्के कपात करण्यात येणार असली तर जीएसटी, आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क आणि अन्य शुल्क तुम्हाला वेगळे भरावे लागणार आहे. हि सवलत फक्त एग्जीक्यूटिव्ह चेयर क्लासवाल्या रेल्वेगाड्यांमध्येच मिळणार आहे. यासाठी ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉरमेशन सिस्टिम’ला एक सॉफ्टवेअर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हि सवलत लागू झाल्यानंतर चार महिन्यात यामध्ये काही फरक जाणवल्याचा रिपोर्ट देखील देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ट्रेन-18 मध्ये देखील सवलत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या रेल्वेच्या ट्रेन-18 मध्ये देखील सवलत देण्यात येणार असून दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणारी हि रेल्वे अर्धी रिकामीच धावत असल्याने यावर हा मार्ग काढला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –