थेऊर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागावर ताण

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागास इतरांचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने यावेळी कोरोनाने आपले रौद्र रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. यावेळी रुग्णाची तपासणी, विलगीकरण,उपचार याबरोबरच लसीकरण याची सर्व जबाबदारी आरोग्य विभाग नेटाने पार पाडत असल्याचे दिसते.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सर्व देश या लढ्यात एकसंघ उभा राहिला यात आरोग्य विभागासोबत महसूल, पोलिस याच बरोबर ग्रामविकास खाते एकत्रित काम करीत होते लाॅकडाऊन काळात प्रत्येकांनी चोख भूमिका बजावली परंतु सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेच्या काळात महसूल, ग्रामविकास व पोलीस हे तेवढे कार्यरत असल्याचे दिसून येत नाही यावर संबंधित खात्याच्या वरिष्ठांनी नक्की विचार करण्याची आवश्यकता आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाचे पुन्हा गाव पातळीवर नियोजन करणे आवश्यक बनले आहे कारण याचा खूप परिणाम झाल्याचे त्यावेळी दिसून आले प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, खाजगी डॉक्टर व स्वयंसेवी यांच्या मदतीने संपूर्ण गावात प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची तपासणी करायची त्याची अद्ययावत माहिती संकलित करून आढळलेल्या रुग्णाची प्राथमिक शालेत विलगीकरन करून उपचार देता येऊ शकतात.असे सर्वेक्षण झाले तर संसर्ग वाहक रुग्ण लवकर शोधले जाऊन समूह संसर्गाचा धोका रोखता येईल.