×
Homeक्राईम स्टोरीPune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर...

Pune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – Married Woman Suicide | मुलगा होत नसल्याने दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी, यासाठी विवाहितेला मारहाण करुन तिचा छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह (Married Woman Suicide with Child) विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangav Police Station) तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पती विरोधात गुन्हा दाखल

रंजना तांबे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या आई-वडिलांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार, पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर माहेरच्यांनी विवाहितेचा मृतदेह पतीच्या घरासमोर जाळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पतीच्या दुसऱ्या लग्नाला महिलेचा विरोध

मयत रंजना यांना दोन मुली झाल्याने पतीने दुसरे लग्न करण्याचा तगादा लावला होता.
परंतु याला मयत रंजना यांचा विरोध होता.
यामुळे पती आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इतर आरोपींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.
तसेच गरोदर असताना तिला अवजड कामे करायला लावली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

दीड वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

आरोपी पतीने 8 जून रोजी रंजना यांना मारहाण केली होती. रोजच्या त्रासाला वैतागून रंजना यांनी दीड वर्षाच्या मुलीसह 9 जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शिवहरीनगर येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर संतप्त झालेल्या विवाहितेचा मृतदेह नवऱ्याच्या घरासमोर जाळला. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

…म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक

आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती

पिंपरी चिंचवड : सुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर

संतापजनक ! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेऊ नका’

महापौरांचे पती आणि आरएसएस प्रचारक 20 कोटींचं कमिशन मागताना कॅमेर्‍यात कैद, व्हायरल सीडीमुळं प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News