Pune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand crime news| गावात विद्युत पुरवठा करणार्‍या डीपीमधील तांब्याच्या तारा काढून घेऊन गावकर्‍यांना अंधारात ढकलणार्‍या चोरट्यांना लोणीकंद (Lonikand) पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश प्रल्हाद पटेल (वय १९, रा. वेळु, ता. भोर), अली तसव्वर खान (वय १९), अल्ताफ अन्वर अली (वय २३), हरिगोविंद तुळशीराम चौधरी (वय २३, सर्व रा. वेळु, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते सर्व जण मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांनी चोरलेल्या ७०० किलो तांब्याच्या तारा विकत घेणारा भंगार विक्रेता धिरज अशोक जैन (रा. दत्तनगर, कात्रज) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या चोरट्यांकडून कोलवडी, बकोरी, फुलगाव या भागातील ७ तसेच राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ आणि सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील १ असे १० डि पी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Thieves arrested for stealing 700 kg of copper wire from DP)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे व पोलीस अंमलदार समीर पिलाणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, डी पी मधील तांबे चोरणारे चार जण लोणीकंद पावर हाऊसजवळील डी पी लगत आळंदी रोडला थांबलेले आहेत.
या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस पथक गेले असताना त्यांना चौघे जण डीपीजवळ वावरताना दिसले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडील दोन दुचाकीमध्ये बांधलेल्या ठिक्यांमध्ये हातोडे, छन्नी, स्क्रु ड्रायव्हर, एक्सा ब्लेड, कटर, विविध स्पॅनर असे साहित्य आढळून आले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी डी पी चोरुन त्यातील तांब्याच्या तारा करुन त्या भंगारात विकत असल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून चोरीचे तांबे विकत घेणार्‍या भंगार विक्रेत्यालाही अटक करण्यात आली.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहायक फौजदार मोहन वाळके, पोलीस अंमलदार कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, समीर पिलाणे, सागर कडु, बाळासाहेब तनपुरे यांनी ही कामगिरी केली आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web title : Pune Lonikand crime news|thieves arrested for stealing 700 kg of copper wire from dp