#Video Viral : OMG ! ‘या’ अभिनेत्रीने शूटिंगवेळी काढले कपडे, कारण ऐकून व्हाल ‘थक्क’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दक्षिण भारतातील अभिनेत्री अमला पॉल आपल्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमला लवकरच तेलगू चित्रपट ‘आमे’ मध्ये दिसून येणार आहे. अमला हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा आधीच एका सीनमुळे चर्चेत आली आहे. काही लोक तिच्या सीनची स्तुती करता आहेत. तर काही जण सोशल मीडियावर समस्या देखील बनवता आहेत. हा सीन न्यूड आहे. या सीन मध्ये अमलाने सीनच्या वेळी सर्व कपडे काढले आहेत.

अमलाने या चित्रपटामध्ये एका लैंगिक अत्याचारने पीडित असलेल्या मुलीचा रोल केला आहे. हा एक थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. स्क्रिप्टच्या मागणीनुसार अमलाला कपडे काढून शूट करावे लागले. हा चित्रपट रत्ना कुमार डायरेक्ट करता आहेत. या चित्रपटात दक्षिणची अभिनेत्री अमला पॉलने आपला चित्रपट अदाई साठी निर्वस्त्र होऊन रोल करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले.

जेव्हापासून या चित्रपटाचा टीजर समोर आला आहे. सगळीकडे चित्रपटाची खळबळ उडाली आहे. या टीजर मध्ये एक काळजीत पडलेली आई आपल्या हरवलेल्या मुलीची तक्रार दाखल करायला जाते. आधी तिची दखल घेतली जात नाही. परंतु पोलीस नंतर तपास सुरु करतात आणि ती मुलगी एका ऑफिसमध्ये तणावपूर्ण आणि नग्न अवस्थेत सापडते.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक