असा करा आपला फोटो WhatsApp Stickers मध्ये कन्वर्ट

वृत्तसंस्था : सोशल नेट्वर्किंग जगतातही सर्वाधिक लोकप्रिय अप्लिकेशन व्हॉट्सअॅप आपल्या युजर्स साठी नेहमीच काही तरी नवीन घेऊन येते. आता व्हॉट्सअॅप वर गेल्या काही दिवसांपासून स्टिकर्सचा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय तुम्ही देखील वापरला असेल. एवढेच काय तुम्ही व्हॉट्सअॅप दिवाळीच्या शुभेच्छा या स्टिकरद्वारे  पाठवल्या असतील. पण आता कोणत्याही फोटोला तुमही स्टिकर्स मध्ये कनव्हर्ट करू शकता. अतिशय इंटरेस्टिंग असे हे फिचर आहे.

या गोष्टी लक्षात घ्या

सर्वप्रथम तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. तुम्हाला जो फोटो स्टिकरच्या रुपात हवा आहे त्या छायाचित्रामागे बॅकग्राउंड नसणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला फोटो ‘नो बॅकग्राउंड’ इमेजमध्ये कन्वर्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही कन्वर्टेड इमेज WhatsApp स्टिकर्सच्या यादीत अपलोड करावी लागेल. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp चे लेटेस्ट व्हर्जन किंवा २. १८ व्हर्जन अन्यथा यापेक्षा अॅडव्हान्स व्हर्जन इन्स्टॉल असणे गरजेचे आहे.

फॉलो करा ‘या’ स्टेप्स

– सर्वात अगोदर मोबाईलमधून तुम्ही फोटो क्लिक करा किंवा गॅलरीमध्ये सेव्ह असलेला फोटो सिलेक्ट करा जो तुम्हाला स्टिकर बनवायचा आहे.

– यानंतर तुम्हाला हा फोटो PNG फाईलमध्ये कन्वर्ट करावा लागेल म्हणजेच बॅकग्राउंड रिमूव्ह करावे लागेल.

– यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोरवर जाऊन बॅकग्राउंट इरेजर अॅप डाउनलोड करा. खात्री करुन घ्या की जो अॅप तुम्ही डाउनलोड कराल तो व्हेरिफाईड असणे गरजेचे आहे.

– बॅकग्राउंड इरेजर अॅप इन्स्टाल केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या किंवा क्लिक केलेल्या छायाचित्राला अपलोड करा आणि त्याचे बॅकग्राउंड डिलीट करुन ते PNG टाईप फाईल फॉरमॅटमध्ये सेव्ह करा.

– यानंतर पुन्हा गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन पर्सनल स्टिकर्स फॉर WhatsApp अॅप लिस्टमधून व्हेरिफाईड अॅप डाउनलोड करा.

– यानंतर या अॅपमध्ये जा आणि कन्वर्ट केलेल्या फोटोला अपलोड करा आणि WhatsApp च्या सहाय्याने आपल्या मित्रांना किंवा ज्यांना पाठवायचा आहे त्यांना पाठवा. अशाप्रमाणे तुम्ही स्वत:चा कोणताही फोटो WhatsApp स्टिकर्समध्ये रूपांतरित करू शकता.