सावधान ! ‘हा’ व्हायरस चोरुन काढतो तुमच्या मोबाईलमधून तुमचा ‘फोटो’ आणि ‘व्हिडिओ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल सिक्युरिटी फर्म Lookout ने एका अशा अ‍ॅन्ड्राॅईड मालवेअरचा सुगावा लागला आहे, जो व्हायरस तुमच्या फोनमध्ये शिरुन तुमचा डेटा चोरतो. एवढेच नाही तर तो तुमचा फोटो देखील क्लिक करतो. याशिवाय हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये आला तर तो तुमचा व्हिडिओ देखील बनवू शकतो आणि हे सर्व कधी होईल याची तुम्हाला भनक देखील लागणार नाही. तुम्ही मोबाईलवर जेव्हा काहीही टाईप करत असतात त्याला देखील हा व्हायरस रेकॉर्ड करुन घेतो. अशा पद्धतीने स्मार्टफोनमधील सर्व बाबींची माहिती हा व्हायरस चोरतो. या व्हायरसचे नाव आहे Monokle.

खरंतर हा एक मालवेअर नसून कस्टम अ‍ॅन्ड्राॅईड सर्विलांस टूल्सचा एक सेट आहे. ज्या माध्यामातून कोणावरी नजर ठेवता येते. यामुळे हा सर्वात धोकादायक मालवेअर सांगितले जात आहे. सध्या असा देखील दावा केला जात आहे की हा मालवेअर रशियातील एक कंपनी स्पेशल टेक्नलॉजी सेंटरने तयार केला आहे.

टार्गेट बनवून चोरला जातो डेटा –
मोबाईल सिक्युरिटी फर्म लुकआऊटने एक ब्लॉक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लुकआऊटने या व्हायरस Monokle चा शोध २०१८ मध्ये लावला होता. त्यांना संशोधनात हे आढळले की हे टूल काही टारगेडेट कँपेनचा भाग आहेत आणि याला रशियांच्या पीटर्सबर्गच्या कंपनी स्पेशल टेक्नाॅलॉजी सेंटरने तयार केले आहे. याच कंपनीचे नाव २०१६ साली प्रेसीडेंशियल इलेक्शन मध्ये जीआरयू ला मटेरिअल सपोर्ट देण्यात समोर आले होते. संशोधनांनी सांगितले की, मोनोकल रिमोट एक्सेस ट्रोजन फंक्शन च्या मदतीने अडवांस डेटा एक फिल्टरेशन टेक्निक वापरते. या पद्धतीने ते डिवाइसमध्ये ट्रस्टेड सर्टिफिकेट्सच्या जागी अटॅकर – स्पेसिफायड सर्टिफिकेट इंस्टॉल करतात.

संशोधकांनी सांगितले की ट्रस्टेड सर्टिफिकेट च्या जागी दुसरे सर्टिफिकेट इन्स्टॉल करुन नंतर त्यात MITM म्हणजेच मॅन इन द मिडिल चा रस्ता उघडला जातो. काही दिवसांपूर्वी एक असे प्रकरण समोर आले होते की इजरायल कंपनी एनएसओ ग्रुपकडून मालवेअर Pegasus चे च अपडेटेड वर्जन यूजर्सचा गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझान आणि अ‍ॅपल आयक्लाऊडपर्यंत सर्व डेटा चोरु शकत होता.