2 रुपयांची ‘ही’ फाटकी-जुनी नोट बनवू शकते तुम्हाला लखपती, Good Luck साठी लोक लाखो उडवण्यासाठी तयार

नवी दिल्ली : भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांचा काही खास वस्तू किंवा आकड्यांवर खुप विश्वास असतो. गुडलकसाठी ते आपली गाडीच्या नंबरमध्ये खास डिजिट्स लावतात. असे लोक लकी चार्म्ससाठी लाखो, करोडो रूपये खर्च करण्यासाठी तयार असतात. सध्या तुम्ही ऑनलाइन एक खास प्रकारची नोट विकून लखपती बनू शकता. ऑनलाइन असे अनेक लोक आहेत जे मोठ्या प्रयत्नाने 786 अंकवाल्या नोट शोधत आहेत. हा अंक अनेक लोक शुभ मानतात. जर तुमच्याकडे अशी नोट असेल, तर ती ऑनलाइन विकून तुम्ही घरबसल्या लाखो रूपये कमावू शकता. याबाबत डिटेल्स जाणून घेवूयात…

खुप वर्षांपूर्वी जेव्हा 1 आणि 2 रुपयांच्या नोट्स चालत होत्या, तेव्हाच्या करन्सीला आता खुप डिमांड आहे. विशेषता गुलाबी रंगाच्या दोन रूपयांच्या नोटीचा लोक जास्त शोध घेत आहेत. या नोटेवर 786 लिहिलेले असेल तर यासाठी काही लोक लाखो खर्च करण्यासाठी तयार आहेत.

ईबाय, इंडियन ओल्ड कॉइन आणि क्लिक इंडिया सारख्या साइट्स या नोटा शोधत आहेत. या साइट्सवर तुम्ही अशा नोट टाकून विकू शकता.

क्लिक इंडिया साइटवर व्हॉट्सअपवर सुद्धा नोट डायरेक्ट विकण्याची लिंक मिळू शकते. यात सेलर म्हणून तुम्ही रजिस्टर होऊन तुमच्याकडील नोट विकू शकता. लोक येथे तुमच्याशी संपर्क करतील.

सध्या दोन रूपयांच्या या नोटेची किंमत 80 हजारपेक्षा जास्त आहे. तिची मागणी पाहता लवकरच तिची किंमत लाखाच्या पुढे जाईल. या नोटेवर 786 नंबर हवा. हा सध्या पाचशेच्या नोटेवर सुद्धा आहे. याचाही काही लोक शोध घेत आहेत. म्हणून पुढील वेळी तुम्ही एटीएममधून पैसे काढले आणि हा नंबर दिसला तर ती नोट तुम्ही ऑनलाइन विकू शकता.

You might also like