Video : दिदार दे ! सध्या ‘हा’ व्हिडीओ सोशलवर घालतोय धुमाकूळ

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस’ चित्रपटामधील गाणे प्रेक्षकांना खुप पसंतीस पडले होते. या चित्रपटातील सगळे गाणे प्रसिद्ध झाले होते. मात्र, ‘दिदार दे’ हे गाणे खुपच प्रसिद्ध झाले. इतकेच नव्हे तर या गाण्याचे प्रेक्षकांना खुप वेड लागले. चाहत्यांनी या गाण्याचा व्हिडिओ देखील बनवला व सोशल मिडियावर पोस्ट केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील या गाण्याला कोरियोग्राफ सोनाली भंडारी हिने केले आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत स्याळी गाटने पण डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओला ‘LiveToDance with Sonali’ नावाने युट्यूब चॅनेलला अपलोडही केले आहे. सोनाली बॉलिवूडमधील कोणत्याही गाण्यावर सुंदर डान्स करते. ती नेहमी तिच्या डान्सचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करत असते. या व्हिडिओमध्ये दोघींनी खुपच सुंदर डान्स केला आहे. हा व्हिडिओ ६ मे ला अपलोड केला. आत्तापर्यंत या व्हिडिओला २५८,९२१ वेळा चाहत्यांनी पाहिला आहे.

सोशल मिडिया हे एक असे माध्यम आहे. ज्यावर कोणीही सहभागी व्हायला उत्सुक असतात. कारण, या माध्यामामुळे आज तरुण-तरुणींना जगभर आपली कला लोकांना दाखविण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. ज्या लोकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत नाही. त्यांना हे माध्यम एक वरदान म्हणून मिळाले आहे.