Tiger 3 Movie | सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटाची कथा झाली लीक; चाहत्याच्या आले लक्षात

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या आगामी चित्रपट टायगर 3 (Tiger 3 Movie) मुळे चर्चेत आहे. टायगर 3 चित्रपटामध्ये सलमान व कटरिना कैफ (Salman and Katrina Kaif) यांची जोडी अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार असल्यामुळे दोघांच्या चाहत्यांना या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. मात्र सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाची कथा लीक झाली असल्याचा (Tiger 3 Story Leaked) प्रकार समोर येत आहे. सलमानच्या एका चाहत्याने ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. चित्रपटाचे कथानक IMDB या साईटवर लीक झाले असल्याचे उघड झाले आहे. ‘टायगर 3’(Tiger 3 Movie) मध्ये ‘एक था टायगरच्या’ (Ek Tha Tiger) आधीची गोष्ट सांगितली जाणार असल्याचा अंदाज त्यावरून लावला जात आहे.

या आधी ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ (Tiger Zinda Hai) असे चित्रपटाचे दोन सिक्विल प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. ‘एक था टायगर’ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफने झोया या आयएसआयच्या गुप्तहेराची भूमिका साकारली होती. आता या झोया पात्राच्या भूतकाळाविषयी तिसऱ्या भागामध्ये सांगितले जाणार असल्याचे बोलले जात आहे. IMDb वर लीक करुन सांगण्यात आलेल्या कथेमध्ये हे सांगण्यात आले आहे की, झोयाच्या भूतकाळातील एक व्यक्ति तिचा बदला घ्यायला या तिसऱ्या भागात समोर येणार आहे आणि याच नव्या मिशनवर टायगर आणि झोया एकत्र काम करणार असल्याचं स्पष्ट झालं (Tiger 3 Movie Story) आहे. झोयाच्या भूतकाळातील त्या व्यक्तीची भूमिका अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) करणार आहे असंही कथेतून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपटासाठी त्याचा चाहता वर्ग देखील नेहमीच उत्सुक असलेले चित्र असते. त्याचा टायगर 3 (Tiger 3 Movie) हा सिनेमा याच वर्षीच्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. IMDB ही साईट चित्रपटांबाबत बहुतांशी खरी माहिती देते त्यामुळे यावर सांगण्यात आलेली कथा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.

ज्याप्रमाणे शाहरुखच्या (SRK) ‘पठान’ चित्रपटामध्ये (Pathan Movie)
शेवटी सलमान खानची एट्री दाखवण्यात आली होती
त्याचप्रमाणे सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटामध्ये पठानची
(Pathan In Tiger 3) छोटीशी भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
चित्रपटामध्ये इम्रान हश्मी देखील भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘टायगर 3’चे शुटिंग पूर्ण झाले असून ऑगस्ट महिन्यामध्ये चित्रपटाचे प्रमोशन सुरू करण्यात येणार आहे. प्रेक्षक सलमान खानच्या टायगर 3 (Tiger 3 Movie) चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nikki Tamboli | निक्की तांबोळीने केले शर्टनेस फोटोशूट; रिव्हिलिंग फोटोने
नेटकरी झाले अवाक

Palak Tiwari | श्वेता तिवारी पलकला जाऊन देत नव्हती
वयाच्या 15 व्या वर्षी डेटिंगला